ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

दादर मध्ये अवलंबलेली पार्किंग व्यवस्था अहिल्यानगर महापालिकेने अवलंबावी – सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा 

अहिल्यानगर- नो पार्किंग ठिकाणी लाल काळे पट्टे मारावे..

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पार्किंग बाबत सुचवलेली सूचना मुंबई महानगरपालिकेने दादर मध्ये अवलंबिली त्या प्रमाणे अहिल्यानगर महानगरपालिकेने ही अवलंबावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी एका पत्रकानव्ये केली आहे.

सध्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या क्षेत्रात रस्त्यावर व इतरत्र कोठेही नागरिकांनी आपली दुचाकी व चारचाकी गाडी पार्किंग केल्यास मोठा दंड आकरले जाते . वास्तविक पाहता नागरिकांना आपली गाडी कुठे पार्क केली तर दंड आहे व कोठे पार्क केली तर दंड नाही याची माहिती नाही व तसे महानगरपालिकेनेही कोणतेही सूचना फलक लावले नाही त्या मुळे नागरिकांना विनाकारण मोठे आर्थिक भुर्दंड सोसावे लागते, या साठी नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकार व मुंबई महानगरपालिकेला आवाहन केल्या प्रमाणे दादर मध्ये अंमलबजावणी केली.

या करिता ज्या ठिकाणी पार्किंग करावयाचे नाही त्या ठिकाणी लाल काळे पट्टे मारावे म्हणजे नागरिकांच्या लक्षात येईल की या ठिकाणी पार्क करू नये, त्या मुळे नागरिकांनाही विनाकारण भुर्दंड सोसावा लागणार नाही व वाहतूक व्यवस्थेलाही मोठी मदत होईल.

सर्रासपणे नागरिक कुठेही वाहने पार्किंग करतात मात्र पार्किंग आणि नो पार्किंग क्षेत्र कोणती आहेत, हे सहजपणे ओळखण्यासाठी लाल आणि काळ्या रंगाचे पुटपाथ म्हणजे नो पार्किंग आणि पिवळ्या काळ्या रंग म्हणजे पार्किंग असे नागरिकांच्या लक्षात येईल. व विनाकारण नागरिकांचे होणारे आर्थिक नुकसान टळेल, त्यामुळे जर लाल काळ्या रंगाची पट्टी असलेल्या भागात वाहन पार्क केली तर मोठी दंडात्मक कारवाई होऊ शकते व पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या फुटपाथसमोर पार्किंगला परवानगी असणार आहे.

या करिता अहिल्यानगर महानगरपालिकेने शहरात व गर्दीच्या ठिकाणी जेथे जेथे पार्किंग करू नये अशा ठिकाणी लाल काळे पट्टे मारून त्या ठिकाणी नागरिकांनी आपले वाहने पार्किंग करू नये असे आवाहन करावे व तसे फलक ठीक ठिकाणी लावावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे