ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

पद्मशाली बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत लेखन व वाचन साहित्य वाटप

पुणे

पद्मशाली बहुउद्देशीय संस्थेचे वतीने पुणे येथील भवानीपेठ येथील बाल विकास संस्था संचलित बाल जीवन विकास प्राथमिक शाळेत हुशार होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य प्रत्येकी चार वह्या ,ऐतिहासिक विविध महापुरूषांचे थोरांची गोष्टींचे पुस्तके आणि संविधानाची प्रत वाटप कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांतशेठ मिठ्ठापल्ली यांचे अध्यक्षते खाली महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघमचे सहसचिव गणेश शेरला, महाराष्ट्र राज्य पद्मशाली महिला संघमचे अध्यक्षा तथा पद्मशाली शिक्षण संस्था सोलापूर चे विश्वस्त संगीताताई इंदापुरे , पद्मशाली बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष बद्रीनाथ जन्नू यांचे हस्ते प्रमुख पाहूणे म्हणून महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघमचे प्रधानसचिव यशवंत इंदापुरे,उद्योगपती नरसिंग राजकोंडा, शाळेचे माजी विद्यार्थी विलास मद्देल, शाळेचे सचिवा जयश्री मामील मॅडम यांचे उपस्थितीत अत्यंत उत्साहात संपन्न झाले.

प्रथम संस्थेचे सचिवा जयश्री मामिल मॅडम यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.शाळेचे मुख्याध्यापिका दिपाली चव्हाण यांनी प्रस्तावनेत संस्थेचे तसेच शाळेचे प्रगती बाबत माहिती दिली.

सदर प्रसंगी मान्यवरांचे हस्ते सरस्वती पुजन करून व्दिप प्रज्वलन केले. त्यानंतर संस्थेचे वतीने सर्व उपस्थित मान्यवरांना नारळ आणि बुके देऊन सत्कार केले. यावेळी गणेश शेरला यांनी मार्गदर्शन भाषणांत यापुढे शाळेतील होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत वेळोवेळी देण्यास तयार असलेचे सांगितले. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार व वारसा पुढे चालवत शिक्षणामुळे आपण यशाचे शिखर गाठू शकतो. आणि आई- वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवनाचे रान करत यश संपादन करा.

विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत परीश्रम ,जिद्द आणि चिकाटी ने ज्ञानाचा बळावर यश संपादन केले पाहिजे असे म्हटले. संगीताताई इंदापुरे यांनी परिस्थिती चा बाऊ न करता शिक्षण घ्यावे आणि जीवनात यशस्वी व्हावे यासाठी उदाहरणांसह गोष्ट सांगून पटवून दिले. विलास मद्देल हे या शाळेचे विद्यार्थ्यी असल्याचे अभिमानाने सांगितले.

यशवंत इंदापुरे यांनी या शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन माजी विद्यार्थ्यी संघटना स्थापन करून त्यामार्फत शाळेसाठी सहकार्य करावे असे सुचविले. सदर कार्यक्रमावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वाचन/ लेखन साहित्य ( शैक्षणिक साहित्य ) वाटप मान्यवारांच्या हस्ते देण्यांत आले.

सदर कार्यक्रम यशस्वी होणे साठी बद्रीनाथ जन्नू अश्विनी कुमार चिन्नी, लक्ष्मण संगा, अशोक दुडम, तसेच अंबिका उटकूर ,रूपाली गादिया , शबाना इनामदार मॅडम, शरद कुदळे सर यांनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे आयोजन बद्रीनाथ जन्नू यांनी केले तर शाळेचे मुख्याध्यापिका दिपाली चव्हाण मॅडम सुत्रसंचलन केले आणि चंद्रकांतशेठ मिठ्ठापल्ली यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे