ब्रेकिंगमहाराष्ट्र
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार – २०२६ साठी ऑनलाइन स्व-नामांकन प्रक्रिया सुरू
अहिल्यानगर

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार – २०२६ साठी ऑनलाइन स्व-नामांकन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
राज्यातील पात्र शिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. यासाठी ३० जुलैपर्यंत मुदत आहे.
या पुरस्कारासाठी राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील तसेच मान्यताप्राप्त अनुदानित खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षक अर्ज करू शकणार आहेत.




