ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

प्राची थिगळे शाकाहारी टिफीन स्पर्धेत प्रथम.

अहिल्यानगर- जय आनंद महावीर युवक मंडळ आयोजित स्पर्धा..

प्रत्येक महिलेमध्ये पाककलेचे गुण असतात. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सकस, ताजे आणि पौष्टिक अन्न देण्यासाठी त्या स्वयंपाक घरात अतिशय आपुलकीने स्वयंपाक करतात.

सध्याच्या जंक फूडच्या काळात मुलांना शुद्ध शाकाहारी पौष्टिक टिफीन देताना महिला कल्पकता दाखवतात. त्यामुळे मुलं घरचा टिफीन आनंदाने खातात. सुगरण महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी जय आनंद महावीर युवक मंडळाने ला मोठा प्रतिसाद मिळाला. माहिती झाली. अशा मिळण्यास मदत होते, असे यांनी केले.

आयोजित केलेल्या स्पर्धे महिलांना चांगल्या रेसिपींची स्पर्धांतून महिलांना प्रोत्साहन प्रतिपादन सिमा राहुल मुनोत नवी पेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळाच्या वतीने महिलांसाठी पौष्टिक शाकाहारी टिफीन स्पर्धा नुकतीच ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राची अमोल थिगळे (ज्वारीचे पौष्टिक धिरडे) यांना मिळाला, द्वितीय क्रमांक उषा नितीन शेठिया (मोरींगा स्केअर्स), तृतीय क्रमांक शिल्पा पियुष मुथ्था (कडधान्याचे स्प्राऊड अप्पे) तर उत्तेजनार्थ पारितोषिक शैला सुरेश सोनसळे (बाजरीच्या पुया), वर्षा विशाल गुंदेचा (नाचणी व ज्वारीचं नूडल्स), सोनल तरटे (नाचणीचे लाडू), कोमल पवार (ज्वारीचे घावण) यांना मिळाले.

सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सिमा मुनोत, स्पर्धेच्या जय आनंद महावीर युवक मंडळाच्या शाकाहारी टिफीन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांच्या समवेत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी मंडळाचे पदाधिकारी,परीक्षक राणी शरद मुधा, मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, सेक्रेटरी आनंद मुथा, कार्याध्यक्ष सत्येन मुधा, प्रमोद गांधी (पीटू) आदी उपस्थित होते.

शैलेश मुनोत म्हणाले की, नगरच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेले जय आनंद महावीर युवक मंडळ यंदा रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे.

यंदाचा गणेशोत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे नियोजन आहे. वर्षभर दर महिन्याला विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

महिलांसाठी मंडळ कायम विविध उपक्रम राबवित असते. शाकाहारी पौष्टिक टिफीन बनवा स्पर्धेतून महिलांच्या पाक कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.

ऑनलाईन माध्यमातून स्पर्धा घेतल्याने अधिक महिलांना सहभागी होता आले. स्पर्धेच्या ठिकाणी येण्याजाण्याचा त्यांचा वेळ वाचला. सर्वच स्पर्धकांनी अतिशय उत्तम रेसिपी सादर केल्या. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळ यापुढेही वेगवेगळे उपक्रम निवितच राबवेल. मंडळाचे कार्य वर्षभर चालू असते.

आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी शिबिर, शालेय विद्याथ्यर्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, विविध सामाजिक विषयावर खुल्या निबंध स्पर्धा, आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अन्नदान, वारकरी सेवा, वंचित मुलांच्या संस्थांना किराणा, क्रीडा साहित्याची भेट, विविध सन्मान, करणाऱ्यांचा माहितीपर दिनदर्शिका प्रकाशन व मोफत वितरण, शिक्षक दिनी गुरुजणांचा सन्मान, स्वच्छता अभियान, मतदार जागृती, पर्यावरण संवर्धन, महावीर जयंतीला अहिंसा, शांततेचा संदेश असे विविध उपक्रम राबविण्यात येतात, मंडळाचे सर्व सभासद उत्साहात सर्व उपक्रमात सहभागी होतात.

यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने सर्वच सभासदांचा उत्साह आणखी वाढला आहे. विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून हे वर्ष संस्मरणीय करण्याचा प्रयत्न आहे.

स्पर्धेतील विजेत्या प्राची थिगळे, उषा शेठिया, शिल्पा मुथा यांनी मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. प्रत्येक घरात महिले समोर दररोज सकस आणि पौष्टिक टिफीन मुलांना देण्याचे आव्हान असते.

अशा स्पर्धांमुळे महिलांना आपलं पाक कौशल्य, कल्पकता दाखवण्याची संधी मिळते तसेच इतरांच्याही चांगल्या रेसिपी समजतात, त्यामुळे वेळोवेळी अशा स्पर्धा झाल्या पाहिजेत अशा भावना विजेत्या महिलांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या शेवटी आनंद मुथा यांनी आभार मानले.

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे