ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

शहरात खंडणी, धारदार शस्त्रांचा वापर करून परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगार विजय पठारे टोळीविरोधात मकोका कारवाई

अहिल्यानगर

शहरात खंडणी, धारदार शस्त्रांचा वापर करून परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगार विजय पठारे टोळीविरोधात मकोका कायद्यानुसार सोमवारी कारवाई करण्यात आली आहे. विजय पठारे व त्याच्या टोळीविरुद्ध शहरातील कोतवाली व तोपखाना पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत.

टोळीवर अनेक गुन्हे

या टोळीविरुद्ध धारदार शस्त्रांसह घटनापणे दरोडा टाकणे, हत्येचा प्रयत्न, हप्त्याची आदेशाचे उल्लंघन करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, विनयभंग यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

टोळीप्रमुख विजय राजू पठारे रा. मुक्तेश्वर कॉलनी, सिद्धार्थनगर यांच्यासह अजय राजू पठारे, किरण मोहन जाधव, सनी रंजित चावरें या टोळीतील सदस्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

तोपखाना पोलिसांचा प्रस्ताव

तोपखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांनी विजय पठारे टोळीवर मकोका कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. निलेश बाबासाहेब ससाणे अशी कारवाई झालेल्या गुन्हेगारांचे नाव आहे.

मकोका लागू झाल्याने आता या टोळीतील सदस्यांना जामीन मिळणे कठीण होणार आहे. शहरातील खंडणी व दहशतीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे