ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

हिंगणगाव सेवा सोसायटीचे चेअरमनसह 2 संचालक थकबाकीमुळे अपात्र, 40 सभासदांच्या तक्रारीला यश

ऑडिट रिपोर्टमध्ये थकबाकी उघड..

अहिल्यानगर येथील हिंगणगाव, ता. जि. अहिल्यानगर येथील दत्तात्रय हिंगणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन रंगनाथ नामदेव दरंदले, माजी व्हाईस चेअरमन बाबूलाल उस्मान सय्यद व संचालक शिवदास शंकर त्रिंबके यांना अहिल्यानगर तालुका उपनिबंधक शुभांगी गौड यांच्या आदेशान्वये थकबाकीदार असल्याने अपात्र ठरविण्यात आले आहे.

40 सभासदांची लेखी तक्रार

सदर संचालकांविरोधात संस्थेचे विद्यमान संचालक दिलीप सिनारे व इतर 40 संस्थेच्या सभासदांनी तालुका उपनिबंधक कार्यालय, अहिल्यानगर यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार तालुका उपनिबंधक शुभांगी गौड यांच्यासमोर वेळोवेळी सुनावणी घेण्यात आली. अर्जदार सभासदांच्या वतीने वकील बबनराव कवडे यांनी युक्तिवाद केला.

ऑडिट रिपोर्टमध्ये थकबाकीचा उल्लेख

युक्तिवादात सांगण्यात आले की, संस्थेच्या ऑडिट रिपोर्टमध्ये सन 2023-24 आणि 2024-25 मध्ये ऑडिटर शिंदे यांनी सदरचे तिन्ही संचालक थकबाकीदार असल्याचे नमूद केले आहे. तसेच संस्थेच्या वार्षिक सभेमध्ये या सर्व सभासदांनी संबंधितांच्या वसुलीविषयी जोरदार मागणी केली होती. परंतु सेवा संस्थेच्या सचिव व पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने न घेता सभासदांना उडवा-उडवीची उत्तरे दिली वसुलीच्या संदर्भात कोणतीही कार्यवाही केली नाही.

खोटी माहिती सादर केल्याचा आरोप

उलट सुनावणी दरम्यान संस्थेचे सचिव विलास म्हस्के यांनी तालुका उपनिबंधक यांच्याकडे हे तिन्ही संचालक आज रोजी थकबाकीदार नाहीत अशी खोटी व चुकीची लेखी माहिती सादर केली. मात्र संस्था हितचिंतक 40 सभासदांच्या वतीने वकील बाबुराव कवडे यांनी अनेक लेखी दाखले देत या तीनही संचालक कसे अपात्र आहेत हे अनेक पुराव्यासह पटवून दिले.

10 जूनपासून संचालक पद रद्द

खरी वस्तुस्थिती समोर मांडल्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73(1A)(1)(ब) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 चे नियम 58 अन्वये अपात्र ठरत असल्याने त्यांना समिती सदस्यत्व बंद झाल्याचे व त्यांची संचालक पदाची जागा रिकामी झाल्याची दिनांक 10/06/2026 पासून आदेशित करीत असल्याचे तालुका उपनिबंधक यांनी जाहीर केले. खर्चाबतही काही आदेश देण्यात आलेला नाही.

सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण

सदरील निकालामुळे गावातील सेवा सोसायटीच्या सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. तसेच सभासदांमधून संस्थेने आतापर्यंत केलेल्या भ्रष्ट कारभाराची व संस्था आर्थिकदृष्ट्या लाखो रुपयांनी तोट्यात का गेली याची चौकशी करण्यात यावी व संबंधित पदाधिकाऱ्यांकडून सदर रक्कम वसूल करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

संस्थेचे सचिव विलास म्हस्के यांनी तालुका उपनिबंधकांना वेळोवेळी लेखी स्वरूपात खोटी व चुकीची माहिती दिलेली असल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही सभासदांनी जोरदार मागणी केली आहे.

 

 

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे