
या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने दोन पंचांच्या उपस्थितीत दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला. छाप्यादरम्यान असीम हमीद शेख (वय 33, रा. रामवाडी, सर्जेपुरा, अहिल्यानगर) हा एका पांढर्या रंगाच्या मारुती 800 मोटारगाडीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस भरताना पोलिसांना आढळून आला. त्याच्याकडे कोणताही वैध परवाना अथवा अधिकृत परवानगी नसल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी घटनास्थळाची झडती घेतली असता गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारी विद्युत मोटार, कॉम्प्रेसर, रबरी पाईप, गॅस जोडणीचे साहित्य, वजनाचा काटा तसेच भारत गॅस आणि एचपी गॅस कंपनीच्या एकूण आठ घरगुती गॅस टाक्या जप्त केल्या.
याशिवाय गॅस वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी अंदाजे 1 लाख रुपये किमतीची मारुती 800 मोटारगाडीही ताब्यात घेण्यात आली. जप्त केलेल्या सर्व साहित्याची एकूण किंमत सुमारे 1 लाख 27 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.




