ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

चुल मटन रस्सा हॉटेल चालकाला विशाल रावसाहेब भोर यांना फोन करण्याच्या बहाण्याने लुटले

अहिल्यानगर

शहरातील काटवन रेल्वे स्टेशन रोडवरील गायके मळा परिसरात एका हॉटेल चालकाला गाठून चार अनोळखी चोरट्यांनी २८ हजार ३७६ रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल रावसाहेब भोर (वय ३२, रा. चास, अहिल्यानगर) यांचे चास येथे चुल मटन रस्सा नावाचे हॉटेल आहे. १५ जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास विशाल भोर हे गायके मळा परिसरातून जात होते.

त्यावेळी एका अनोळखी इसमाने त्यांच्याजवळ येत मला तातडीचा फोन करायचा आहे, तुमचा मोबाईल द्या अशी विनंती केली. भोर यांनी विश्वासाने आपला मोबाईल फोन त्याच्या हातात दिला.त्या इसमाने मोबाईल कानाला लावून बोलण्याचा बहाणा केला आणि दबा धरून बसलेल्या दुसर्‍या साथीदाराच्या मोटारसायकलवर बसून तो पळून गेला. विशाल भोर काही समजण्याच्या आतच आणखी एक अनोळखी इसम मोटारसायकलवर तिथे आला. चला, मी तुम्हाला चोर कुठे गेले ते दाखवतो असे सांगून त्याने भोर यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला.

अशा प्रकारे चार अनोळखी आरोपींनी संगनमत करून विशाल भोर यांच्याकडून २५ हजार ५०० रुपयांची रोकड आणि फोन पे खात्यावरील २ हजार ८७६ रुपये, असा एकूण २८ हजार ३७६ रुपयांचा माल फसवणूक करून चोरून नेला. या घटनेनंतर विशाल भोर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे