ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

प्रगत विद्यालयात बारावी बोर्डाच्या परीक्षेची फी भरण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक आणि शैक्षणिक फसवणूक

अहिल्यानगर

अहिल्यानगर येथील गांधी मैदान परिसरातील प्रगत विद्यालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षेची फी भरण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक आणि शैक्षणिक फसवणूक केल्याप्रकारणी विद्यालयाचा लिपिक लुहाण लक्ष्मण पहिलाज रॉय याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सर्जेपुरा येथील किराणा व्यावसायिक अमोल टिल्लु गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी लिपिकाने फिर्यादीचा मुलगा आणि इतर चार विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करून, त्यांच्याकडून बारावी बोर्ड एटीकेटी परीक्षेचे शुल्क रोख स्वरूपात गोळा केले होते. मात्र, सदर रक्कम ऑनलाइन पद्धतीने बोर्डाकडे जमा न करता, एकूण ३ हजार १५० रुपयांचा अपहार केला.

यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून त्यांची फसवणूक झाली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गायकवाड यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी लुहाण पहिलाज रॉय विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे