ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

अहिल्यानगर सीए विद्यार्थी WICASA (विकासा) शाखेचा पदग्रहण सोहळा संपन्न

अहिल्यानगर

अहिल्यानगर मधील  सीए विकासा शाखेच्या पदाधिकारयांचा पदग्रहण समारोह रविवारी २२ मार्च रोजी सीए शाखेच्या पश्चिम विभाग (WIRC WICASA) चे अध्यक्ष सीए राजेश अगरवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

पदग्रहण समारोहत बोलताना सीए राजेश अगरवाल यांनी समारंभात आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना करिअर, शिस्त आणि सातत्य यांचे महत्त्व पटवून दिले.

तसेच, “चार्टर्ड अकाउंटन्सी हे केवळ व्यावसायिक शिक्षण नसून ते एक जबाबदारीचे क्षेत्र आहे. प्रामाणिकपणा, मेहनत आणि वेळेचे व्यवस्थापन हे यशाचे मुख्य घटक आहेत.” त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच व्यावहारिक ज्ञान मिळवण्याचा सल्ला दिला.

सीए विकासा शाखेच्या वर्ष २०२६-२०२७ पदाधिकारी म्हणून अध्यक्ष सीए महेश तिवारी, कार्यकारी सदस्या सीए सुनंदा रच्चा, उपाध्यक्ष मोक्षी बोरा, सचिव हर्षल फिरोदीया, खजिनदार सिद्धी गुगळे, सहसचिव जितेश खुराणा, सहखजिनदार ईशा कटारिया, कार्यकारिणी सदस्य साक्षी साठे यांनी पदभार स्विकारला.

आपल्या अध्यक्षीय भाषणात सीए महेश तिवारी यांनी पुढील वर्षात घेण्यात येणारे सर्व कार्याक्रमचा आढावा सादर करून २६-२७ या वर्षाची थीम “NISHCHAY (निश्चय)” चे उपस्थित मान्प्रवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

येणाऱ्या वर्षात शाखेने विद्यार्थी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय संमेलन, शैक्षणिक सहल, औद्योगिक सहल, युवा महोत्सव आणि क्रीडा महोत्सवाचा समावेश आहे असे संगितले.

यावेळी सीए फाऊंडेशन आणि इंटर पास झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. पदग्रहण समारोह निमित मुलांना प्रेरणा म्हणून सीए ज्ञानेश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी WICASA अहिल्यानगर शाखेचे माजी अध्यक्ष देखील उपस्थित होते.

सदर कार्यक्रमास सीए शाखेचे अध्यक्ष सीए अभयकुमार कटारिय, सचिव सीए महेश भळगट, सदस्य काजल चंदे व माजी अध्यक्ष प्रसाद पुराणिक तसेच सीए मोहन बरमेचा, सीए प्रसाद भंडारी, सीए ज्ञानेश कुलकर्णी, सीए (डॉ) परेश बोरा, सीए संदीप देसरडा, सीए ज्ञानेश्वर काळे, सनित मुथा, रोहित बोरा ई. उपस्थित होते.

कार्यक्रमाला अहमदनगरमधील सीए विद्यार्थी, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नव्या कार्यकारिणीच्या सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे