ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

सहजयोगाचे कार्य हे समाजाला दिशा देणारी आहे – उपमहापौर धनंजय जाधव

अहिल्यानगर

प. पु. माताजींचा 103 वा वाढदिवस अहिल्यानगर मध्ये संम्पन्न.

प. पु. माताजी निर्मला देवी यांचा 103 वा वाढदिवस सहजयोग चारिटेबल ट्रस्ट व सहजयोग परिवाराच्या वतीने अहिल्यानगर येथील सहज भुवन आश्रम मध्ये संम्पन्न झाले या वेळी वाढदिवसाचे औचित्य साधून अहिल्यानगर महानगरपालिकेचे महापौर व उपमहापौर यांचा सन्मान सहजयोग परिवारातील जेष्ठ सहजयोगी लक्ष्मण अंदे, उत्तम बेरड, विनायक जोग, मेजर पोतदार व बोटकर काका यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी बोलतांना उपमहापौर धनंजय जाधव म्हणाले सहजयोग ध्यान साधने बाबत मला लहानपणा पासून माहिती आहे परंतु हा सहजयोग जगातील 140 देशापेक्षा जास्त देशा मध्ये आहे याची माहिती नव्हती. सहजयोगा मुळे समाजातील अनेक घटकांना याचा फायदा होतो व या योगामुळे समाज परिवर्तन होऊ शकते. सहजयोगाचे कार्य हे समाजाला दिशा देणारे असल्यामुळे याचा लाभ जास्तीत जास्त घटकांनी घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. जिल्हा समन्वयक श्रीनिवास बोज्जा यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश सूर्यवंशी यांनी मानले तर आभार अमित बुरा यांनी केले. कार्यक्रमांस अहिल्यानगर शहरसह जिल्ह्यातील सहजयोगी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीकरणे साठी सहजयोगी रवींद्र आगरकर, गणेश कोडम, संदीप गांगर्डे, शुभम भालदंड, अशोक कराळे, गजेंद्र सांगळे, धनंजय ढाकणे, कार्तिक ढाकणे, मनोहर म्याना, मनोहर अंकम आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे