

कॅन्सर जनजागृती अंतर्गत यादव वाडी येथील महिला साठी हा कॅम्प घेण्यात आला …दिनांक 28 डिसेंबर 2025.. स्थळ…यादव वाडी तालुका पारनेर..
या प्रसंगी निमा वुमन फोरम च्या अध्यक्ष डॉ रत्ना बल्लाळ , डॉ अंशु मुळे , डॉ मानसी कांबळे , डॉ भारती पाचारणे यांनी कॅन्सर ची लक्षणे , कारणे व उपाय या संबंधी माहिती दिली..

व प्रत्यक्ष स्व स्तन तपासणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखविले व सर्वांचीच स्तन तपासणी व गर्भाशय मुखाची च कॅन्सर तपासणी करण्यात आली.. एकूण 40 महिलांनी याचा लाभ घेतला..
सरपंच शेळके साहेब ,ग्रामसेवका आश्लेषा ताजणे व अशा वर्कर्स यांनी सहकार्य केले..




