ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

सावेडी उपनगरातील महिलेच्या घरावर अनाधिकृत ताबा,10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहिल्यानगर

सावेडी उपनगरातील बिशप लॉईड कॉलनी परिसरात एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून अनाधिकृतपणे ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी अनिता खिस्ती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात प्रमोद पगारे, सनी पगारे, कपिल पगारे आणि इतर सात ते आठ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अनिता खिस्ती या मूळच्या पुणे येथील रहिवासी असून, सावेडीतील मॅक केअर हॉस्पिटलसमोर त्यांचा प्लॉट नंबर 380 मध्ये बंगला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी हे घर विक्रीसाठी काढले होते. त्यावेळी प्रमोद पगारे याने घर खरेदीसाठी बोलणी केली होती. मात्र किमंतीवरून व्यवहार न ठरल्याने फिर्यादीने घर विकण्यास नकार दिला होता. यावरून संशयित आरोपीने घर विकले नाही तर ताबा टाकला जातो अशी धमकी दिली होती.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात फिर्यादी कुटुंबियांसह पुण्यात असताना, संशयित आरोपींनी संधी साधून घराच्या आवारात पत्र्याचे शेड ठोकून ताबा घेतला. 22 जानेवारी रोजी हा प्रकार उघडकीस आला. फिर्यादीने जाब विचारला असता, संशयित आरोपींनी त्यांना दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे