ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

माय वोट इज माय फ्युचर या विषयावर छत्रपती अभियांत्रिकी आणि इन्नरव्हील क्लब अहमदनगर व्हिनस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानातून मतदार जनजागृती

अहिल्यानगर

महाविद्यालयीन युवक युवतींना निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करणारे मतदार जनजागृती विषयक ‘माय वोट इज माय फ्युचर’ या विषयावर नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय येथे व्याख्यान आयोजित केले गेले होते.

या विषयावर व्याख्यान देण्यासाठी व्याख्याते म्हणून लाभलेले श्री. प्रसाद बेडेकर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या अनोख्या शैलीत मतदानाचे महत्त्व, मतदाराचे कर्तव्य आणि अधिकार नानाविध प्रकारची उदाहरणे देत समजावून सांगितले. भारतासारख्या लोकशाही प्रजासत्ताक देशात मताधिकाराचा वापर करून योग्य व्यक्तीस निवडून देऊन आपले एक मत देश अजून सक्षम आणि विकसित करण्यासाठी कसे महत्त्वाचे ठरू शकते, याविषयी विद्यार्थ्यांना योग्य ती माहिती दिली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. आर. खर्डे सर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करत महाविद्यालयात शिकत असणाऱ्या भावी मतदारांसाठी व्याख्यानाचा हा विषय कित्ती आवश्यक आहे, याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.

इन्नरव्हील क्लब अहमदनगर व्हिनस आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास इन्नरव्हील क्लब च्या अध्यक्षा डॉ. अर्पिता शिंघवी, सेक्रेटरी सौ. प्रगती गांधी, चार्टर्ड प्रेसिडेंट सौ. सारिका मुथ्था, झोनल सब कॉर्डिनेटर सौ. श्रीलता आडेप आदी मान्यवर उपस्थित होते. युवा फेस्टिवल निम्मित घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिके इन्नरव्हील क्लब अहमदनगर व्हिनस मार्फत विजेत्या विद्यार्थ्यांना देण्यात आली.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. अक्षय देखणे, प्रा. निर्मल, प्रा. अमोल परदेशी आदींनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी अल्फिया सय्यद तर आभार प्रदर्शन प्रा. तेजश्री धंगेकर यांनी केले.

कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख कार्यक्रमाप्रसंगी डॉ. एम. के. भोसले, डॉ. एस. एम. वाळके, प्रा. पी. जी. निकम, प्रा. ए. बी. काळे, प्रा. एस. पी. विधाते, डॉ. व्ही. व्ही. पाटील, प्रा. बी. एन. खरड, प्रा. पी. आर . मुटकुळे यांच्यासमवेत सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी देखील उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे