ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंग

अहिल्यानगर शहरात हॉस्टेलच्या इमारतीवरून २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरातील बालिकाश्रम रोड परिसरात असलेल्या एका हॉस्टेलच्या इमारतीवरून पडल्याने २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रतीक ईश्वर तवटे असे मृत तरुणाचे नाव असून, ही घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मयत प्रतीक तवटे हा न्यू आर्ट्स कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या बालिकाश्रम रोडवरील एका हॉस्टेलमध्ये वास्तव्यास होता. बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तो इमारतीवरून खाली पडला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. रुग्णवाहिका चालक अतुल यादव शिंदे यांनी त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ​याप्रकरणी सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टर गणेश पोले यांनी तोफखाना पोलीस ठाण्याला माहिती दिली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी आकस्मिक मृत्यची नोंद केली आहे.

प्रतीक हा मूळचा कुठला होता आणि तो इमारतीवरून नेमका कसा पडला, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. तोफखाना पोलिसांनी या प्रकरणाचा पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. ऐन तारुण्यात प्रतीकचा असा अपघाती मृत्यू झाल्याने त्याच्या मित्रपरिवारात मोठी शोककळा पसरली आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे