ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

पद्मशाली स्नेहीता संघम तर्फे हळदीकुंकू समारंभ प्रसंगी महिला वकिलांचा सत्कार संपन्न

अहिल्यानगर

अहिल्या नगर येथील पद्मशाली स्नेहीता संघम या महिला मंडळ तर्फे नुकताच संक्रांत हळदीकुंकू समारंभ संपन्न झाला..

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संगमनेर येथील नवनिर्वाचित नगरसेविका सौ सरोजिनी पगडाल तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ नलिनी गीते ( नेत्र रोग तज्ज्ञ ) या उपस्थित होत्या..

महिलांनी आत्मनिर्भर होऊन स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी व स्वतः साठी जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवावं असे प्रतिपादन पगडाल सरोजिनी यांनी केले….

डॉ. नलिनी गीते यांनी नेत्रदानाची माहिती व महत्व सांगून मोतीबिंदू शस्त्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञान मुळे खूप सुलभ झाली आहे. प्रत्येक महिलांनी चाळीशी नंतर डोळ्याची तपासणी करून घ्यावी असे सुचवले….

ॲड. पूनम वड्डेपल्ली, ॲड. सुजाता बोडखे, ॲड. लक्ष्मी छाया रामदिन ,ॲड लक्ष्मी लखापती ,ॲड गौरी सामलेटी , ॲड स्विटी कोडम , ॲड. वर्षा सुरकुटला , ॲड. प्रतीक्षा मंगलारम ,या महिला वकिलांचा सत्कार शाल,श्रीफळ , स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले…..

अध्यक्ष डॉ रत्ना बल्लाळ यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचे परिचय सपना छिंदम , सूत्रसंचालन साधना कोल्पेक यांनी केले आरती छिंदम यांनी आभार मानले..

पूनम वन्नम , रेखा वड्डेपल्ली ,सविता एकलदेवी यांनी सहकार्य केले.. सर्व महिलांना तिळगूळ हळदीकुंकू वा न देण्यात आले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे