ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

प्रभाग क्रमांक 6 मधून माजी नगरसेविका वीणा बोज्जा व श्रीनिवास बोज्जा अपक्ष लढणार – श्रीनिवास बोज्जा

अहिल्यानगर

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग 6 मधून वीणा बोज्जा यांनी भारतीय जनता पक्षा कडे निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी मागितली होती परंतु पक्षाने उमेदवारी न दिल्याने अपक्ष निवडणूक लढविण्याचे निश्चित केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी दिली.

येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी वगळता इतर कोणत्याही पक्षांकडे उमेदवाराची मागणी नव्हती तर या पक्षांकडेही काही प्रभागात उमेदवारही नव्हते तर इतर पक्ष खिरापती सारखे उमेदवारांना ए बी फॉर्म वाटत होते ही फार मोठी शोकांतिका आहे. या निवडणुकीत अनेक अर्ध्या हळकुंडाणे पिवळे झालेले उमेदवार उभे असलेले दिसून येत आहे.

उमेदवार कसा असावा याची कोणतीही नियमावली कोणत्याही पक्षांकडे दिसून आली नाही, जो तो पक्ष आपले कोरम पूर्ण करण्यामध्ये मग्न होता, फक्त उमेदवार कसा निवडून येईल किंवा त्याची परिस्थिती निवडून येण्याची आहे का इतकेच पाहून तिकीट वाटप होत होते. उमेदवार आपल्या पक्षासाठी किती वर्ष काम केले, उमेदवार सुशिक्षित आहे का, उमेदवाराचे चरित्र कसे आहे, उमेदवाराला महापालिकेचे ज्ञान आहे या गोष्टीची कोणत्याही पक्षाने पडताळणी केले नसल्याचे दिसून आले या मुळेच की काय चांगले, सुशिक्षित, अभ्यासू सामाजिक कार्यकर्ते या निवडणुकीतून माघार घेतल्याचे दिसून आले, किंबहुना अपक्ष उभे राहणेच पसंत केले.

आता सर्व मदार मतदारांची आहे, मतदाराने आपला प्रभागातील उमेदवार निवडून देतांना तो उमदेवार सुशिक्षित आहे का, अभ्यासू आहे, तरुण आहे की वयोवृद्ध, सामाजिक कार्याची आवड आहे की, निवडून आल्यानंतर आपले पोट भरण्याचे साधन निर्माण करेल, जनतेचा रक्षक होईल की भक्षक या सर्व गोष्टीची पडताळणी करून मतदान करणे काळाची गरज आहे.

या निवडणुकीत अनेक उच्च शिक्षित उमेदवारांना उमेदवारी दिली नाही, अनेक वर्षानुवर्षे काम करणाऱ्या पक्षीय कार्यकर्त्यांना डावलण्यात आले तर कोणतेही जातीय समीकरण न लावता सर्व समाजाना न्याय कसे मिळेल हे न पाहता फक्त आणि फक्त आर्थिक परिस्थिती पाहून व पुढाऱ्यांनी आपला जवळचा आपले सोई सुविधा पूरवीणाऱ्या कार्यकर्त्याला की जो पक्षाचा काम कमी व पुढाऱ्याचे जास्त करेल अश्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिल्याचे दिसून येत आहे.

मतदार राजाने लोकशाहीचा आधारस्तंभ होण्याची हिच वेळ असून कोणत्याही गोष्टीच्या प्रलोभाणाला बळी न पडता सुशिक्षित, समाजाची जाण असणाऱ्या उमेदवाराला मतदान करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे