ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहरात मुलीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते बदनामीप्रकरणी गुन्हा दाखल

अहिल्यानगर

सोशल मीडियाचा गैरवापर करून एका अल्पवयीन मुलीच्या नावाचे बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून तिच्या कुटुंबाची बदनामी केल्याचा प्रकार अहिल्यानगर शहरात उघडकीस आला आहे.

याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोपरगाव तालुक्यातील कांचनवाडी परिसरात राहणाऱ्या एका पीडितेने यासंबंधीची तक्रार दिली आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पीडितेच्या नावाचा वापर करून बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार केले. या खात्यावरून आरोपीने पीडितेच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीला संदेश (मॅसेज) पाठवले.या कृतीमुळे पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिच्या कुटुंबाची समाजात बदनामी झाली. पीडितेने सायबर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. त्यानुसार, सायबर पोलिसांनी तातडीने माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे