ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर जिल्ह्याला मिळाली आणखी एक एक्सप्रेस ट्रेन , ११ ठिकाणी थांबणार

महाराष्ट्राला आणखी एक एक्सप्रेस ट्रेन मिळाली आहे. शिर्डी ते तिरूपती ही साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेन सुरू झाली आहे. चार राज्यातून ही ट्रेन धावणार आहे अन् ३१ स्थानकात थांबणार आहे.

शिर्डी ते तिरूपती हा ३१ तासांचा प्रवास असेल. केंद्रीय मंत्री व्ही.सोमन्ना यांनी तिरुपती-साईनगर शिर्डी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. शिर्डी-तिरूपती या एक्सप्रेस ट्रेनचा सर्वाधिक फायदा मराठवाड्यातील लोकांना होणार आहे. ही एक्सप्रेस राज्यात ११ स्थानकात थांबणार आहे, त्यामधील बहुतांश स्थानके ही मराठवाड्यातीलच आहे.

त्यामुळे मराठवाड्यात प्रवास कऱण्यासाठी नवीन ट्रेन मिळणार आहे. त्याशिवाय शिर्डी अन् तिरूपती ही दोन देवस्थानेही या ट्रेनमुळे जोडली जाणार आहेत.

नव्या एक्सप्रेस ट्रेनमुळे तिरुपती आणि शिर्डी ही तीर्थक्षेत्र जोडली गेली आहेत. या मार्गावर नेल्लोर, गुंटूर, सिकंदराबाद, बिदर, मनमाड यासह इतर महत्त्वाच्या ३१ ठिकाणी या ट्रेनला थांबे आहेत.

या ट्रेनमुळे तीर्थक्षेत्र पर्यटन, कनेक्टिव्हिटी सुधारणार आहेच. त्याशिवाय मार्गाच्या आसपासच्या परिसरातल्या आर्थिक विकास वाढणार आहे.

नवीन रेल्वेगाडीमुळे महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि सिकंदराबाद या परिसरांना थेट कनेक्टिव्हिटी मिळेल. तसेच यामुळे परळी वैजनाथ हे शिवभक्तांसाठी महत्त्वाचं असलेले तीर्थक्षेत्रदेखील जोडले जाणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे