ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर कल्याण रोडवर जमावाचा पोलिसांवर हल्ला

अहिल्यानगर

अहिल्यानगर तोफखाना पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांवर दहा ते बारा जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला. नगर कल्याण रोडवरील रेल्वे उड्डाण पुलावरून एका अज्ञात महिलेनं रेल्वे रूळावर आत्महत्या केली होती. यानंतर रेल्वे उड्डाण पुलावर अनेक नागरिक रस्त्याला अडथळा करून उभे होते. त्यांना रस्त्यावरून बाजूला करताना पोलिसांना मारहाण झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी महिलेनं रेल्वे रूळावर आत्महत्या केली होती. मृतदेहामुळे जमाव पुलावर थांबून रस्त्यात अडथळा निर्माण करत होता. रस्ता मोकळा करण्यासाठी आणि नागरिकांना बाजूला करण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल बाळासाहेब भापसे आणि पोलिस अविनाश बर्डे घटनास्थळी पोहोचले.

पोलीस कर्मचाऱ्यांनी उपस्थितीत नागरिकांना रस्त्यावरून बाजूला काढण्याचा प्रयत्न केला. त्याचदरम्यान, अचानक दहा ते बारा जणांनी पोलिस कॉन्स्टेबल बाळासाहेब भापसे आणि पोलिस अविनाश बर्डे या दोघांवर हल्ला झाला. नागरिकांनी केलेल्या हल्ल्यात दोघेही गंभीररित्या जखमी झाले आहेत.

एका जखमी कर्मचाऱ्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, दुसऱ्या कर्मचाऱ्याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तोफखाना पोलीस ठाणे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकांनी मोठ्या प्रमाणावर तपास तसेच शोधमोहीम सुरू केलीय.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे