ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नगरसेवकपदाच्या उमेदवाराच्या नवऱ्यावर जीवघेणा हल्ला, मॉर्निग वॉकला गेले असता चाकूने सपासप वार

अकोल्यातील राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. अकोल्यातील नगरसेवकपदाच्या उमेदवाराच्या नवऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. मॉर्निंग वॉकसाठी गेले असतान ३ जणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले.

या हल्ल्यात एमआयएमच्या उमेदवाराचा नवरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर सध्या अकोट ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेच्या प्रभाग १५ च्या नगरसेवकपदाच्या एमआयएमच्या महिला उमेदवार उज्वला तेलगोटे यांच्या नवऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. मॉर्निंग वॉकला गेले असता आज सकाळच्या सुमारास त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यात राजेश तेलगोटे गंभीर जखमी झाले आहेत. मॉर्निंग वापरून घरी परत येत असताना तीन जणांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.

या हल्ल्यात राजेश तेलगोटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर अकोटच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्याची माहिती समजतात तेलगोटे यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. दरम्यान याप्रकरणी अकोट शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या घटनेमुळे अकोल्यात मोठी खळबळ उडाली आहे. राजकीय वादातून तेलगोटे यांच्यावर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली.

आज नगरपालिका प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच हा हल्ला झाल्याने पोलिसांची मोठी धावपळ झाली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे