ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

घरात घुसून अल्पवयीन मुलीशी अश्लिल चाळे

अहिल्यानगर

अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीसोबत घरात घुसून गैरवर्तन केल्याचा प्रकार शुक्रवारी (28 नोव्हेंबर) दुपारी चारच्या सुमारास घडला. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात विनयभंग, पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र अण्णासाहेब कुसाळे (वय 53) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.भावाचा अपघात झाल्याने त्याला भेटण्यासाठी शुक्रवारी फिर्यादी अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात गेल्या होत्या. याच दरम्यान, संशयित आरोपी हा फिर्यादीच्या राहत्या घरी जेवणाची मोकळी प्लेट देण्यासाठी गेला होता.

याच संधीचा गैरफायदा घेत त्याने अल्पवयीन मुलीची छेड काढून अश्लिल चाळे केले. सदरची घटना फिर्यादीला समजल्यानंतर त्यांनी संशयित आरोपीला याबाबत विचारणा केली असता, त्याने त्यांना शिवीगाळ करून ‘तुम्हाला काय करायचे आहे ते करा, माझे कोणी काही करू शकत नाही’, अशी धमकी देत दमदाटी केली.

या प्रकारानंतर, पीडितेच्या आईने अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे गाठून घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.

पोलिसांनी घटनेची नोंद घेत राजेंद्र अण्णासाहेब कुसाळे याच्याविरोधात विनयभंग, पोक्सो कलमानुसार शनिवारी (29 नोव्हेंबर) गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पतंगे हे करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे