अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सुनीता भांगरे यांचा भाजपमध्ये प्रवेश
अहिल्यानगर

भाजपा प्रदेश कार्यालय मुंबई
अकोले विधानसभा मतदारसंघातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा श्रीमती सुनिता अशोकराव भांगरे आणि शेंडी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. दिलीपराव भांगरे यांच्यासह तालुक्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृत पक्षप्रवेश केला.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात नव्या कार्यकर्त्यांचे भाजपा परिवारात स्वागत करण्यात आले. या प्रवेशामुळे अकोले तालुक्यात पक्षसंघटना अधिक मजबूत होणार असून, स्थानिक पातळीवरील विकासकामांना नवे बळ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास माजी आमदार श्री. वैभव पिचड, ज्येष्ठ नेते श्री. सिताराम भांगरे, तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपला उमेदवार मिळाला. अकोले तालुक्यातील अगस्ती साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुनीता भांगरे यांचा भाजपमध्ये प्रवेश.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. या पदासाठी भाजपकडून शोध सुरू होता. काही दिवसापूर्वी भांगरे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली होती.
त्यानंतर आज मुंबईत प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भांगरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. आता त्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जाणार आहेत.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांचे आकस्मिक निधन झाले. त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अकोल्यात येऊन अमित भांगरे आणि सुनीता भांगरे यांना ताकद आणि संधी देणार असल्याचे सांगितले होते.
त्यानुसार त्यांनी प्रयत्न केले. मात्र भांगरे यांना त्यात यश आले नव्हते. आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर भांगरे यांनी पवारांची साथ सोडून भाजपचे कमळ हाती घेतले आहे.




