ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

पतसंस्था, फायनान्स ने कोरोना काळात जनतेचे खराब केलेले सिव्हिल दुरूस्त करा- शिव राष्ट्र सेना

अहिल्यानगर - आझाद मैदानावर करणार उपोषण

अहिल्यानगर कोरोना काळात जगावर आलेलं संकट आणि त्या संकाटात बहुतांशी पतसंस्था फायनान्स यांनी गरीब व हातावर पोट भरणारे तसेच नोकरदार, कष्टकरी,मजुर, कामगार,शेतकरी यांना कर्ज व कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी हातांवर व बचत गट करून कर्ज दिले.

त्यात काही पतसंस्थेचे वसुली अधिकारी यांनी जनतेचे पैसे पतसंस्थेत न भरता फस्त केले.तसेच काही पतसंस्था बंद पडल्या अशा विविध गोष्टी घडल्या यामुळे जनतेचे या मध्ये सिव्हिल खराब झाले.

यामुळे आता बहुतांशी लोक शासकीय योजना व बॅंकेच्या कर्जापासून वंचित आहे.या साठी मुंबई आझाद मैदानावर शिव राष्ट्र सेना पक्षाच्या वतीने उपोषण करण्यात येणार अशी माहिती देण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे