ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

मोहरम मिरवणुकांमध्ये डीजेला बंदी

अहिल्यानगर

17 जूनपासून सुरू होणाऱ्या मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगर शहर पोलिसांनी तयारीला वेग दिला आहे. मोहरम मिरवणुकांमध्ये डीजे वाजविण्यास सक्त मनाई करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून डीजे जप्त करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांनी दिला.

शांतता समितीची बैठक

मोहरम उत्सवाच्या अनुषंगाने छोटे बारा इमाम कोठला परिसरात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, भिंगार कॅम्पच्या सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात, गोपनीय शाखेचे कर्मचारी, विविध यंग पार्टीचे पदाधिकारी, सरबत गाडी चालक, ठेंभा व सवारी मिरवणूक मंडळांचे प्रमुख तसेच जबाबदार नागरिक उपस्थित होते.

बैठकीदरम्यान मोहरम उत्सव आयोजकांनी मिरवणूक मार्गावरील खड्डे तातडीने बुजविणे, पुरेशी वीज व्यवस्था उपलब्ध करून देणे, महिला बंदोबस्त वाढविणे तसेच सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, व्हिडिओवर लक्ष ठेवण्याची मागणी केली. यावर पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले.

17 ते 26 जून दरम्यान उत्सव

नगर शहरातील मोहरम उत्सव देशभरात प्रसिद्ध मानला जातो. यंदा उत्सवाला 17 जूनपासून प्रारंभ होणार असून 26 जूनपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आणि मिरवणुका पार पडणार आहेत. 21 जून रोजी मोहरमची पाचवी असून त्यादिवशी कोठला परिसरात सवारी स्थापना केली जाणार आहे. 25 जून रोजी रात्री मुख्य ठेंभा मिरवणूक निघणार आहे.

दुसऱ्या दिवशी 26 जून रोजी दिवसभर मिरवणुका सुरू राहणार असून रात्री सावेडीभाग येथे सवारी विसर्जन केली जाणार आहे. यंदा एकूण 27 सवारी मोहरम उत्सवात सहभागी होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

डॉ. टिपरसे यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या मिरवणूक मार्गाचाच वापर करण्यात यावा. ऐनवेळी मार्ग बदलण्याचा प्रयत्न केल्यास किंवा पोलिसांनी उभारलेल्या बॅरिकेडिंगची मोडतोड केल्यास संबंधितांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्यात येतील.

तसेच उत्सव काळात सोशल मीडियावर विशेष वॉच ठेवण्यात येणार असून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे