ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

महापालिका स्थायी समितीच्या सभापती सुभाष लोंढे तर महिला बालकल्याण सभापती दिपाली बारस्कर बिनविरोध

महिला बालकल्याण समिती सभापतीपदासाठी दिपाली बारस्कर तर उपसभापतीपदासाठी वर्षा सानप मैदानात.. महापौर ज्योतीताई गाडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अर्ज सादर..

अहिल्यानगर महापालिका स्थायी समितीच्या सभापती सुभाष लोंढे तर महिला बालकल्याण सभापती दिपाली बारस्कर यांचे अर्ज दाखल अधिकृत निवडीची घोषणा उद्या दहा मार्चला होणार उपसभापती वर्षा सानप

अहिल्यानगर महानगरपालिका येथील स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपचे नगरसेवक सुभाष लोंढे यांनी आपला उमेदवारी अर्ज नगरसचिव मेहर लहरे यांच्याकडे दाखल केला. या अर्जाला सुचक म्हणून नगरसेवक मनोज कोतकर तर अनुमोदक म्हणून निखिल वारे यांनी सह्या केल्या.

तसेच मनपा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका दिपाली बारस्कर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जाला सुचक म्हणून सुनिता भिंगारदिवे तर अनुमोदक म्हणून अनिता शेटीया यांनी सह्या केल्या.

दरम्यान, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती पदासाठी भाजपच्या नगरसेविका वर्षा सानप यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जाला सुचक म्हणून वंदना ताठे तर अनुमोदक म्हणून रोशनी त्रिंबके यांनी सह्या केल्या.

यावेळी महापौर ज्योतीताई गाडे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नगरसेवक विकी जगताप, भाजपच्या गटनेत्या शारदाताई ढवण तसेच नगरसेविका संध्या पवार, शीतल ढोणे, नगरसेवक ऋग्वेद गंधे, अजिंक्य बोरकर, विजय गव्हाळे, बाळासाहेब बारस्कर, बाळासाहेब पवार, महेश तवले, महेश लोंढे, विजय पठारे, सतीश शिंदे, अनिल ढवण, सुनील त्रिंबके, अजय ढोणे, किसन भिंगारदिवे, जितू गंभीर आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे