
माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दुकाने व आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक आहे. त्यासाठी 24 विभाग स्तरावर दुकाने व आस्थापना खात्यातील वरिष्ठ सुविधाकार व सुविधाकारांचे पथक गठीत करण्यात आले आहे.
त्यांना कारवाईचे अधिकार देण्यात आले असून दिनांक 28 नोव्हेंबर 2023 पासून कारवाई सुरु करण्यात येणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.