ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्रसामाजिक

श्रीराम जन्मोत्सव निमित्त गुलमोहर रोड येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे भाजप जिल्हाध्यक्ष सौ.प्रियाताई जानवे यांच्या पुढाकारातून रामायणकथा प्रवचन संपन्न.

अहिल्यानगर

जसा प्रत्येकाच्या जीवनात एक सखा कृष्ण असावा, तसाच प्रत्येकाच्या मनात मर्यादा पुरूषोत्तम राम असणे आवश्यक आहे. –  वक्त्या वासंती ताई उत्पात. 

श्रीराम जन्मोत्सव निमित्त गुलमोहर रोड येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे भाजप जिल्हाध्यक्ष सौ.प्रियाताई जानवे यांच्या पुढाकारातून राष्ट्र सेविका समितीच्या वीणा ताई धनेश्वर यांच्या तसेच मंदिराचे ट्रस्टी सुनिल मानकर सौ.अर्चना सुनिल मानकर सहकार्यातून दि.23 मार्च ते 25 मार्च 2026 तीन दिवसीय रामायण कथा प्रवचन रूपी आयोजित करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्र सेविका समितीचे कार्य याविषयी सायली लोंढे यांनी माहिती सांगितली.

राष्ट्र सेविका सौ.वासंती ताई उत्पात यांच्या मधुर वाणीतून तसेच सौ.राजश्री ताई गंधे यांच्या रामायणाच्या प्रसंगातून गीतेचे सादरीकरण अगदी ओघवत्या स्वरात करून सलग तीन दिवस रामभक्तांना प्रफुल्लित केले.

यात राष्ट्र सेविका सौ.वीणा धनेश्वर, वासंती उत्पात, राजश्री गंधे, वृषाली भिंगारकर ,सुनिता कुलकर्णी, संपदा कुलकर्णी,सुवर्णा महापुरुष अशा अनेक राष्ट्र सेविका सहभागी होत्या. तसेच तिसऱ्या दिवशी बाल कलाकार गौरी केळकर, कैवल्यकपिले, वैष्णवी दगडे यांनी श्रीराम, लक्ष्मण, सीतामाईचा पोषाख परिधान करून कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला.

जिल्हाध्यक्ष प्रिया जानवे,सुजाता औटी, मीनल गंधे,कालिंदी केसकर, रजनी भंडारी ,केळकर ताई ,लगड ताई ,स्वामी समर्थ मंडळाचे पदाधिकारी ,व परिसरातील प्रचंड भाविकांनी लाभ घेतला. नगरसेवक ऋग्वेद गंधे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

श्रीरामाच्या पालखीच्या संप्रदायातील भाविकासह पावली खेळण्यात,लेझीम पथक लेझीमचा आनंद घेण्यात आला.व आज दि.26/3/2026 मंदिरात श्रीराम जन्मोत्सव निमित्त पाळणा,श्रीरामाची गाणी आरतीनंतर प्रसाद वाटप करून सांगता करण्यात आली.

यासाठी प्रिया जानवे सुजाता औटी ,सुनिल मानकर, अर्चना मानकर, ज्योती लगड,केळकर ताई यांनी विशेष परिश्रम घेतले.या सर्वांच्या परिश्रमासोबत आपणा सर्वांची उपस्थिती आणि कार्यक्रमास दिलेली दाद हेच कार्यक्रमाचे फलित असावे.

श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्रीस्वामी समर्थ.श्रीराम जय राम जय जय राम..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे