ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

आधी झाला ‘बेपत्ता’ मग सापडला मृतदेह ! शहरात चाललंय तरी काय ?

अहिल्यानगर

नगर मार्केट यार्ड पाठीमागील भवानीनगर येथून बेपत्ता झालेल्या २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह भवानीनगर परिसरात असलेल्या वेअर हाऊसच्या पाठीमागे २४ जानेवारीला दुपारी १२.४० च्या सुमारास मिळून आला आहे. इर्शाद मुजाहिद सय्यद (रा. भवानी नगर, वेअर हाऊस गोडावून समोर) असे या तरुणाचे नाव आहे.

इर्शाद सय्यद हा २० जानेवारीला महात्मा फुले चौकातून चक्कर मारुन येतो, असे सांगुन घराबाहेर गेला होता तो पुन्हा घरी परतला नव्हता. याबाबत त्याचे वडील मुजाहिद सय्यद यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.यावरून पोलिसांनी इर्शाद सय्यद नोंद केली होती.

अखेर बेपत्ता झालेला इर्शाद हा भवानीनगर येथे वेअर हाऊसच्या पाठीमागे २४ जानेवारीला दुपारी बेशुद्ध अवस्थेत मिळून आला.त्याचे चुलते तोफिक हरुण सय्यद यांनी त्यास उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. बटुळे यांनी उपचारापूर्वीच इर्शाद हा मयत झाल्याचे घोषित केले.

याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.मृत इर्शाद याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, चुलते असा परिवार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे