ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

पुणे जिल्ह्यात चक्क 46 शाळा अनधिकृत या शाळांमध्ये आपल्या मुलांचे ॲडमिशन करू नका..

अहिल्यानगर

आज 16 जून 2025 पासून राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये 2025 – 26 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे. विदर्भ वगळता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत आणि अशातच पुणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी समोर आली आहे.

आज पासून महाराष्ट्र राज्य बोर्डाचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. विदर्भ विभागातील जिल्हे वगळता राज्यातील इतर 25 जिल्ह्यांमध्ये आजपासून शैक्षणिक वर्ष 2025 – 26 ची सुरुवात झाली असून आज विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील अनेक अनाधिकृत शाळांच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष 2025 26 साठी शासनाची आवश्यक मान्यता नसतानाही विद्यार्थ्यांना ऍडमिशन देत आहेत आणि यासाठी जाहिराती देखील केल्या जात आहेत.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील या शाळांवर कडक कारवाई करण्याचा इरादा व्यक्त करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आता आपण पुणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

पुणे जिल्ह्यात किती अनाधिकृत शाळा आहेत ?

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यात एकूण 13 शाळा पूर्णपणे अनधिकृत आहेत. याशिवाय 24 अशा शाळा आहेत ज्यांना शासनाचे मान्यता प्राप्त असली तरी देखील त्या मुळ जागेवर चालवल्या जात नाहीत.

तर दुसरीकडे जिल्ह्यात नऊ अशा शाळा आहेत ज्यांच्याकडे फक्त इरादा पत्र आहे, म्हणजे या शाळांना अजून अंतिम मान्यता प्राप्त झालेली नाही. अलीकडे बहुतांशी पालक आपल्या मुलांना खाजगी शाळेत ऍडमिशन देत आहेत.

इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण ती संबंधित शाळा मान्यताप्राप्त आहे की नाही याची पालकांनी चौकशी करणे अतिशय आवश्यक आहे.

शाळा अधिकृत नसेल आणि अशा शाळेत जर विद्यार्थी शिकत असतील तर त्या शाळेवर शिक्षण विभागाकडून कारवाई होऊ शकते आणि अशावेळी विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. हेच कारण आहे की संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अनधिकृत शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान पुणे जिल्ह्यात ज्या अनाधिकृत शाळा सुरू आहेत त्या शाळा तातडीने बंद करण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, शाळा सुरू होण्याच्या आधीच आता पुणे जिल्ह्यातील 13 अनधिकृत शाळांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

पुणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी खालील प्रमाणे..

टीएमएस तक्का इस्लामिक स्कूल अँड मतब (कोंढवा)

सेंट व्ह्यू इंटरनॅशनल स्कूल (कोंढवा)

माय स्कूल (ताथवडे)

न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मिडियम स्कूल (बिबवेवाडी)

इमॅन्युअल पब्लिक स्कूल (हडपसर)

मॅथॉन इंटरनॅशनल स्कूल (सोलापूर रोड)

आर्यन वर्ल्ड स्कूल (नहे)

आयडियल पब्लिक स्कूल (धायरी)

महात्मा गांधी प्रशाला

एस.पी. इंग्लिश मिडियम स्कूल (वाघोली)

कलर स्कूल (ताथवडे)

न्यू व्हिजन इंटरनॅशनल स्कूल (पेरणे)

किंग्सवे पब्लिक स्कूल (लोहगावळा)

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे