ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

शेवगांव तालुका हादरला शेवगांव बसस्थानकावर मुलीशी बोलणाऱ्या युवकाचा मारहाणीत दरम्यान मृत्यू

अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

मुलीशी बोलणाऱ्या युवकासह त्याच्या दोन मित्रांना, मुलीच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला…

या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील ठाकूर निमगाव येथे तीन युवकांना मारहाण करण्यात आली होती. जखमीमधील एका युवकाने दुसऱ्या दिवशी शेवगाव पोलीस ठाण्यात संबंधितांच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती. या घटनेतील जखमीचा अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. लोखंडी रॉडने मारहाण फिर्यादी व त्याचे मित्र मोटारसायकल वरून शेवगाव बसस्थानक येथे गेले होते.

बसस्थानकात मुलीशी बोलण्याच्या कारणावरुन तिघा मित्रांना लोखंडी रॉडने मारहाण केली. या घटनेत जखमी झालेल्या तिघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.शवविच्छेदना नंतर त्याच्यावर सायंकाळी उशिरा त्याच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

शेवगांव शहरातील अनेक महाविद्यालये ज्युनियर कॉलेज व माध्यमिक शाळेच्या बाहेरील परिसरात सडक वावर असतो त्याचा त्रास मुलींना तिच्या पालकांना आणि पर्यायाने शालेय आणि महाविद्यालयीन प्रशासनाला चिंतेत टाकणारा आहे यातूनच अशा गंभीर घटना घडण्याची पार्श्वभूमी तयार होते जबाबदार कोण ??? पोलिसांचं दामिनी पथक पालक शिक्षक समिती कमी पडते कां ??

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे