ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगर शहरात लॉन्च झाली सर्वाना परवडेल अशी Toyota ची 7 सीटर कार

अहमदनगर

केडगाव येथील वासन टोयोटा शोरुममध्ये टोयोटाने लाँच केलेली सर्वसामान्यांच्या आवाक्यातील 7 सीटर टोयोटा रुमियन कारचे अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले.

यावेळी इंद्रजीतसेठ नय्यर, अभिजीत खोसे, शोरुमचे जनक आहुजा, अनिश आहुजा, जतीन आहुजा, दिपक जोशी, रविंद्र थोरात, मनोज मदान, कैलाश नवलानी, डॉ.अनिल आठरे, अरविंद गुंदेचा, राजेंद्र चोपडा, संतोष बोथरा, सुनील मुनोत, सौरभ पोखरणा, महेश बिहाणी, राजासेठ नारंग, निलेश मेहेर, रासकर मामा, आंबेकर, वैभव वाघ, सचिन बारस्कर, निलेश सुंभे, सुरज कोतकर, राहुल जाधव, अभय गुजराथी, नगरसेवक मनोज कोतकर आदी उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, सर्वसामान्यांना परवडणारी व अद्यावत सोयी-सुविधांचा समावेश असलेली टोयोटा रुमियन ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. टोयोटा हे सर्वात मोठ्या ब्रॅण्डने सर्वसामान्यांचा विचार करुन बनवलेली कार सर्वांना भुरळ घालत असल्याचे त्यांनी सांगितले.

टोयोटा मोटर्सने सर्वात परवडणारी टोयोटा रुमियन कार बाजारपेठेत आणली आहे. टोयोटा रुमियन ही सध्याची कमी खर्चातील आणि दर्जेदार फिचर्सचा समावेश असलेली उत्तम फॅमिली कार ठरली आहे. ज्याची किंमत 10.29 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारमधील फिचर्स इतर कारच्या तुलनेत उत्कृष्ट आहेत. पेट्रोल आणि सीएनजी पर्यायामध्ये लाँच केलेल्या टोयोटा रूमियनची किंमत विविध रेंजमध्ये पाहायला मिळते.

रुमियनला 1.5-लिटर -सिरीज पेट्रोल इंजिन मिळतं, जे 102 पॉवर आणि 137 टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे, तसेच पर्यायामध्ये ते 87 पॉवर आणि 122 टॉर्क निर्माण करते. गिअरबॉक्स पर्यायांमध्ये मॅन्युअल आणि टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक समाविष्ट आहेत. इंटेरियरबद्दल बोलायचं झाल्यास, नवीन टोयोटा रुमियनमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 7-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते.

याशिवाय टोयोटा आय-कनेक्ट, कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि इतर अनेक वैशिष्ट्यांनी ही कार सुसज्ज आहे. तसेच, टोयोटा रुमियनमध्ये वुड इन्सर्टसह ड्युअल-टोन इंटेरियर्स उपलब्ध आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे