ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

गणेशोत्सवात डीजे, बँजो आणि ढोलचा आवाज मर्यादेत ठेवण्याच्या सूचना

छत्रपती संभाजीनगर

शहरात सध्या गणरायाचा जल्लोष सुरू आहे. २८ सप्टेंबर रोजी बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. यानिमित्त गणेश भक्त गणरायाला डीजे, बँजो, ढोल वाजवून जल्लोषात निरोप देतात. मात्र, या आवाजाने नागरिकांंच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

३५ डेसिबलच्या पुढील आवाजाने हृदयाचे ठोके अनियंत्रित होऊन मेंदूचा रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे चक्कर येण्यास सुरुवात होते. ११५ डेसिबल आवाजाने बहिरेपणा आणि १३५ डेसिबलच्या आवाजाने कानाचा पडदा फाटू शकतो, असे तज्ज्ञ डॅाक्टरांनी सांगितले. त्यामुळे डीजे, बँजो आणि ढोलचा आवाज ३५ डेसिबलच्या आत ठेवून जल्लोषात गणरायाला निरोप द्यावा, असा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे.

शहरात गणरायाचे देखावे पाहण्यासाठी सध्या गर्दी हाेत अाहे. विविध मंडळांकडून डीजे, बँजो, ढोल, लायटिंग, फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष सुरू अाहे. यामुळे गणेश भक्त आनंदाने भारावले आहेत. मात्र, माेठ्या अावाजातील अशी वाद्य वाजवण्यासाठी उच्च न्यायालयाने गणेश मंडळांना काही नियम घालून दिले अाहेत. त्याचे पालन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष ठेवावे, अशा सूचना दिल्या अाहेत.

माेठ्या अावाजाने ८० टक्के बहिरेपणा येण्याची शक्यता
डीजे, बॅँजो आणि ढोलच्या माेठ्या आवाजामुळे तुमचे कान बहिरे होण्याची शक्यता अधिक असते. ११५ डेसिबल आवाज प्रचंड मोठा असतो. या आवाजामुळे ८० टक्के बहिरेपणा येण्याची शक्यता असते. तसेच १३५ डेसिबलच्या आवाजाने तुमच्या कानाचा पडदा फाटतो. १३५ डेसिबल आवाज तुमचे कान झेपवू शकत नाहीत, असे मत कान, नाक, घसा तज्ज्ञ डाॅ. जितेंद्र राठोड यांनी व्यक्त केले.

तर तुम्ही चक्कर येऊन पडाल
डीजे, बँजो आणि ढोलचा मोठा आवाज असतो. यामुळे गणेश भक्त आवाजाचा आनंद घेत नाचतात, परंतु हा मोठा आवाज तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणारा आहे. ३५ डेसिबलच्या पुढे आवाज असेल तर तुमचे हृदय धडधड करायला लागेल. या आवाजामुळे हृदयाचे ठोके अनियंत्रित होऊन कधी जलदगतीने तर कधी संथगतीने ठोके पडायला लागतात. यामुळे मेंदूचा आणि शरीराच्या इतर भागांत होणारा रक्तपुरवठा कमी होतो. चक्कर येण्यास सुरुवात होऊन तुम्ही कोसळू शकता, असा इशारा हृदयविकार तज्ज्ञ डाॅ. प्रशांत उदगिरे यांनी दिला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे