ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सावकाराला 26 लाखांच्या व्याजापोटी 49 लाख दिले, डोक्याला कट्टा लावून वसुली

अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्ह्यातील सावकरकीचा पाश काही केल्या कमी होताना दिसत नाही. सावकारकीच्या अनेक घटना ताजा असतानाच आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. गणेशवाडी, स्वस्तिक चौक येथील व्यापारी हिमेश दिलीप पोरवाल (वय 31) यांनी व्याजाने घेतलेल्या 26 लाख रुपये परतफेडीसाठी 49 लाख 1 हजार 500 रुपये रोख, ऑनलाईन आणि आर.टी.जी.एस.द्वारे दिले.

तरीही, कविता रमाकांत पराळे आणि सोहन सुरेश सातपुते यांच्यासह इतरांनी त्यांच्यावर दबाव टाकून बळजबरीने त्यांची होन्डा कंपनीची कार हिसकावली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी कविता पराळे, रमाकांत पराळे, माहेश्वरी पराळे, प्रणव पराळे, ऋषी पराळे आणि सोहन सातपुते यांच्यासह 4 ते 5 अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जून 2024 ते 7 जुलै 2025 या कालावधीत साकळचंद कस्तुरचंद पोरवाल ज्वेलर्स, सराफ बाजार आणि गणेशवाडी येथील फिर्यादीच्या घरी हा प्रकार घडला. जून 2025 मध्ये कविता पराळे ही फिर्यादीच्या घरी येऊन पैसे मागत शिवीगाळ आणि धमक्या दिल्या. तसेच, फिर्यादीच्या वडिलांच्या नावावरील कार बळजबरीने घेऊन गेली.

7 जुलै 2025 रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता कविता, रमाकांत, माहेश्वरी, प्रणव, ऋषी आणि 4 ते 5 अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीच्या घरी अनधिकृत प्रवेश केला. यावेळी रमाकांत पराळे याने फिर्यादीचा मुलगा वियान याला टी-शर्टला धरून उचलले आणि कट्टा डोक्याला लावून 15 लाख रुपयांची मागणी केली. तसेच, “पैसे दिले नाही तर याला मारून टाकतो,” अशी धमकी दिली.

फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीने रमाकांत याला हातापाय पडून वियानला सोडवले. दरम्यान या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे