ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

कॉलेज तरुणीचे सिनेस्टाईल अपहरण, चार चाकी गाडी आली..आई भावासमोरच तिला ओढले..

अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातून अनेक गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत आहेत. श्रीरामपुरातील सामूहिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता राहुरीमधून कॉलेज तरुणीचे सिनेस्टाईल अपहरण केल्याचे वृत्त आले आहे.

राहुरी तालूक्यातील कोल्हार खुर्द येथे सिनेस्टाईल पद्धतीने एका अल्पवयीन कॉलेज तरुणीचे अपहरण करून तीला चारचाकी वाहनात बसवून पळवून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना दि. १२ जून २०२४ रोजी घडली आहे. सदरील घटनेतील १७ वर्षे वय असलेली अल्पवयीन मुलगी ही १२ वीच्या वर्गात शिक्षण घेत असून ती कोल्हार परिसरात तीच्या कुटुंबासह राहते.

दि. १२ जून २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजे दरम्यान पिडीत मुलगी आई सोबत गवत घेण्यासाठी गेली होती. तेव्हा पिडीत मुलगी पूढे निघुन गेली व तीची आई, बहीण, भाऊ पाठीमागुन गवत घेवुन येत होते. त्यावेळी आरोपीने पिडीत मुलीला घेवुन एका पांढऱ्या रंगाची टाटा मॅझीक गाडीमध्ये बसवून तीचे अपहरण करून पळवून नेले.

पिडीत मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून आरोपी प्रशांत प्रविण भोसले, रा. कोल्हार खुर्द, ता. राहुरी. याच्यावर अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे