ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

हिरकणी गीतांजली वाणी यांना सांस्कृतिक साहित्यरत्न पुरस्कार जाहीर

मुंबई

आम्ही मुंबईकर हे सुपरिचित इ साप्ताहिक साहित्यिक घडामोडीचा उत्तम आढावा घेणारे साप्ताहिक आहे. साप्ताहिक प्रथमतः विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या यशस्वी आणि भरीव योगदानासाठी पुरस्कार प्रदान करणार आहे. हिरकणी गीतांजली वाणी यांची त्यांनी साहित्यिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी साप्ताहिक आम्ही मुंबईकर तर्फे सांस्कृतिक साहित्यरत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

हिरकणी गीतांजली वाणी ह्या ग्रंथालय क्षेत्रात कार्यरत आहेत. वाचन संस्कृती जोपसणारे अनेक उपक्रम त्यांनी ग्रंथालयीन कार्यात राबवले आहेत त्यात विशेष उल्लेखनीय राष्ट्रीय परिषद व राष्ट्रीय कार्यशाळा आहे. राष्ट्रीय परिषदेत आलेल्या संशोधित लेखाच्या पुस्तिकेचे संपादक म्हणुन त्यांनी काम पाहिले आहे.

साहित्यातील त्यांच्या रुचितून त्यांचे दोन कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. दर्पण चारोळी संग्रह (प्रकाशन साल २००६) आणि काव्यांगी अष्टाक्षरी काव्यसंग्रह (प्रकाशन साल २०२१) तसेच नवरंग प्रातिनिधिक काव्यसंग्रहाच्या संपादक म्हणुन देखील त्यांनी काम पाहिले आहे.(प्रकाशन साल २०२२) अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई विभाग अंतर्गत असणाऱ्या उत्तर मुंबई अध्यक्षा म्हणुन जबाबदारी सांभाळली आहे.

साल २०२४ साली शब्दशिल्प कलाविष्कार संघ नोंदणीकृत संस्थेच्या प्रथम राज्यस्तरीय संमेलनाच्या स्वागतध्यक्षा म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. अनेक हातांना त्यांनी लिहिते केले आहे. त्यांचे नानाविध लेख, कविता साहित्य ऑनलाईन तथा ऑफलाईन पुस्तके, मासिके, वृत्तपत्रातून प्रकाशित झालेले आहेत. त्यांना साहित्यिक क्षेत्रातले विविध नामांकित पी सावळाराम साहित्य भूषण, बहिणाबाई चौधरी आणि असे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. साहित्यात नाविन्यपूर्ण कलाकृती करणे त्यांना विशेष भावते. काही साहित्य संमेलनात व सांस्कृतिक कार्यक्रमात त्या वक्त्या म्हणुन आमंत्रित झाल्या आहेत. त्या उत्तम निवेदक आहेत. त्यांनी कोरोना काळात ऑनलाईन नानाविध साहित्यिक उपक्रम यशस्वी करून साहित्यिक मानसिकतेला सकारात्मक केले आहेत. अनेक साहित्यिक स्पर्धा विजेत्या होऊन स्वतः परीक्षक म्हणुन कामगिरी बजावली आहे.

सामाजिक कार्याची आवड असून लाडशखीय वाणी महिला मंडळ पश्चिम उपनगरे कार्यकारिणीत गेली अनेक वर्षे कार्यरत असून सध्या मंडळाच्या सचिव आहेत. त्यांच्या कार्याचा आढावा घेवून आम्ही मुंबईकर साप्ताहिक वृत्तपत्राच्या सांस्कृतिक साहित्यिक रत्न पुरस्काराच्या त्या मानकरी झाल्या आहेत. समाजातील सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे