नवरात्रीचे उपवासासाठी ‘चित्री केळी’ गोड असल्यानं बाजारात फवारणी केळी विकत आहेत..

नगर : सध्या नवरात्रीचे उपवास सुरू आहेत. या काळात केळीला मोठी मागणी असते. अशातच रसायनांचा फवारा मारलेली आरोग्यास धोकादायक असलेली केळी विकली जात असल्याचं आढळून आलयं. ‘चित्री केळी’ गोड असल्यानं भाव जास्त आणि मागणीही जास्त आहे. त्यामुळं केळीवर विशिष्ट प्रकारच्या रसायनाचा फवारा केला जातो, असा संशय आहे.
केळीवर काळे डाग उमटून ‘चित्री केळी’ भासावी यासाठी असा गैरप्रकार केला जातो. शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकातील एका हातगाडीवर अशी केळी विकली जात असल्याचं आढळून आलं. आपण शहरातील ठोक विक्रेत्यांकडून आणल्यानं आपल्याला त्याबाबतीत काही माहिती नाही, असं त्या विक्रेत्याचं म्हणनं आहे.
अन्न व औषध प्रशासनानं यात लक्ष घालण्याची गरज आहे. केळी पिकविण्यासाठी धोकादायक रसायन वापरण्यासोबतच आता ती दर्जेदार भासावी यासाठीही धोकायदाक रसायनांचा प्रयोग होणं हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ आहे.




