नवरात्रीनिमित्त अनोख्या ‘दुर्गामाता वेशभूषा नवदुर्गा स्पर्धे’चा उत्साहात समारोप..
अहिल्यानगर

नवदुर्गेचे रूप, नारीशक्तीचा सन्मान आणि संस्कृतीचा अभिमान..
जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष तथा स्व. आ. अरुण काका जगताप कलाकार कट्ट्याचे कार्याध्यक्ष सुहासभाई मुळे यांच्या पुढाकारातून नवरात्रीनिमित्त आजवर कुठेही आणि कधीही न राबविण्यात आलेला अनोखा उपक्रम म्हणजेच ‘दुर्गामाता वेशभूषा नवदुर्गा स्पर्धा’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
नवरात्रीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधत आयोजित या अनोख्या स्पर्धेतून दुर्गामातेच्या विविध रूपांचे दर्शन घडले. भारतीय संस्कृती, धार्मिक परंपरा, स्त्रीशक्तीचा गौरव आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला. नवदुर्गेच्या विविध रूपांत सहभागी झालेल्या स्पर्धक महिलांनी आपल्या सादरीकरणातून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या प्रसंगी माजी उपमहापौर व नगरसेविका गीतांजली काळे, प्राचार्य निर्मलाताई भंडारी, नवदुर्गा स्पर्धक तसेच अनेक महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
सुहासभाई मुळे यांच्या पुढाकारातून साकारलेल्या या अभिनव उपक्रमाने नवरात्रीच्या उत्सवात एक वेगळी सांस्कृतिक रंगत आणली.





