मुंबई उच्च न्यायालयाने फटाका विक्री करण्यास अगर वाजवण्यास बंदी केलेली नाही-श्रीनिवास बोज्जा
अहिल्यानगर

नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री जी एस कुलकर्णी व न्यायाधीश नीला गोखले यांनी फटाके सार्वजनिक ठिकाणी एक वर्षभर वाजवू नये असा स्वइच्छेने आदेश दिला..
या आदेशाचा नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये संब्रवना अवस्था निर्माण झाली असून मे.कोर्टाने आदेशा मध्ये फटाके वाजवू नये, उत्पादित करू नये अगर विक्री करू नये असा कोणताही उल्लेख केलेला नाही त्यामुळे नागरिकांनी दिवाळी सण फटाके वाजवून साजरा करता येईल यात शंका नाही अशी माहिती दि अहमदनगर फटाका व्यापारी असो चे मा. अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी माहिती दिली.
दिवाळी हा सण हिंदू धर्माचाच नव्हे तर सर्व धर्मियांचा असून ते सालोना साल मोठ्या उत्साहाने फटाके वाजवून साजरा करीत आलेले आहेत त्या मुळे लोकांचे धार्मिक भावना या आदेशामुळे कुठेही दखावले गेलेले नाहीत,त्यामुळे फटाका वाजवण्यासाठी नागरिकांना कोणतीही हरकत घेतलेली नसून फक्त सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नये असा आदेश केलेला आहे.
त्यामुळे नागरिकांना फटाके आपल्या घरा समोर, गल्ली बोळीत, अगर आपल्या अपार्टमेंटच्या पॅसेज मध्ये वाजवू शकता, तसेच व्यापाऱ्यांनी ही या आदेशाची कोणतीही धास्ती घेण्याची गरज नाही, फटाके विक्री करू नये असा कुठेही उल्लेख आदेशा मध्ये केलेला नसल्यामुळे फटाका व्यापारी फटाका विक्रीचा व्यवसाय बिन दिखखत करू शकतात.
फटाक्या व्यवसायावर महाराष्ट्रसह संपूर्ण भारतात लाखो कुटुंबे अवलंबून असून फटाके विक्रीचा व्यवसाय करून आपली उपजीविका चालवतात त्या मुळे सदर व्यवसायावर बंदी आणणे अशक्य आहे.
सदर फटाका व्यवसाया मुळे अनेक बेरोजगारांना दिवाळी सणात रोजगार उपलब्ध होते व या व्यवसायामुळेच यांची दिवाळी साजरी होते.
या साठी महाराष्ट्रातील सर्व फटाका व्यापाऱ्यांनी फटाके विक्रीचा व्यवसाय उत्तम प्रकारे करावे असे आवाहन अहिल्यानगर येथील नगर कल्याण रोड वरील होलसेल फटाका मार्केट चे व्यापारी व फटाका असो चे माजी अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी आवाहन केले आहे.




