सोलापूर शहरात नवरात्रोत्सवात अष्टमीच्या रोजी तेलंगणा राज्याची संस्कृती व परंपरा असलेला ‘ब्रतुकम्मा संबरालू’ सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा..
सोलापूर
‘ब्रतुकम्मा, ब्रतुकम्मा पंडुगा उय्यालो’… याडादी ओकासारी पंडुगा उय्यालो’… चक्क सहा फुटाचा ‘ब्रतुकम्मा’ आकर्षकपणे सजवल्या..
सोलापूर शहरात नवरात्रोत्सवात अष्टमीच्या रोजी तेलंगणा राज्याची संस्कृती व परंपरा असलेला ‘ब्रतुकम्मा संबरालू’ सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला.
काही महिलांनी विविध फुलांचा ‘ब्रतुकम्मा’ आकर्षक पद्धतीने सजावट करुन सहभागी झाल्या होत्या. यामध्ये महिला, युवती व मुलींनी नटूनथटून सहभागी होत ‘ब्रतुकम्मा’च्या विविध लोकगीतांवर लोकनृत्य करत आनंदाने जल्लोष केला. यामध्ये काही महिलांनी तर, चक्क सहा ते सात फुटाचा ‘ब्रतुकम्मा’ आणल्या होत्या.या सोहळ्यात तब्बल 58 बक्षिसे (‘लकी ड्रॉ’) सोडतीद्वारे वाटप करण्यात आले.
जुना विडी घरकुल येथील प्रगती चौकाजवळील, गोविंदराज नगर येथे, श्री गोविंदराज गणेशोत्सव मंडळ व श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित ‘पद्मशाली सखी संघम’ आयोजित ‘ब्रतुकम्मा संबरालू’ सोहळ्यात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. संपूर्ण वातावरण (माहोल) तेलंगणात असल्याची अनुभूती देणारी होती.
यावेळी सर्वोत्तम लोकनृत्य, वेशभूषा, सर्वोत्कृष्ट ब्रतुकम्मा सजावट आणि सहभागी झालेल्या महिलांना ‘लकी ड्रॉ’ द्वारे आकर्षक बक्षिसे देण्यात आले. ‘चाटला पैठणी सेंटर’ तर्फे सेमी पैठणी व आकर्षक साड्या असे एकूण 8 साड्या, डॉ. गीता पिंडीपोल यांच्या ‘देवइको’ हर्बल शॉप कडून 11 आकर्षक बक्षिसे, प्रीविंग्स फॉर यू’च्या वतीने सिध्देश्वर व वनिता पुंजाल यांच्या तर्फे 11 आकर्षक बक्षिसे, सुधाश्री ज्वेलर्सच्या श्रीनिवास कट्टा यांच्याकडून 11 पंचधातूंच्या अंगठ्या, आदिनाथ ॲग्रो प्रा. लि.चे विक्री अधिकारी रवि फलमारी तर्फे 11 आकर्षक बक्षिसे तर, भरत मेरगू यांच्या कडून 6 आकर्षक बक्षिसे देण्यात आले. अशाप्रकारे तब्बल 58 बक्षिसे देण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून, स्थानिक नगरसेवक डॉ. अजय पोन्नम, अरिहंत इंग्लिश मिडीयम स्कूलच्या संचालिका सुलक्षणा पोन्नम, डॉ. गीता पिंडीपोल, श्रीनिवास कट्टा, वनिता व सिध्देश्वर पुंजाल हे उपस्थित होते.
पद्मशाली सखी संघम’च्या अध्यक्षा कला चन्नापट्टण, पल्लवी संगा, ममता तलकोकूल, कल्पना कट्टा, कविता साखरे, प्रिती बोगा, सोनाली तुम्मा, कनकलक्ष्मी तुम्मा, वंशिका जक्का, पद्मा मेडपल्ली, फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, किशोर व्यंकटगिरी, ओमसी पल्ली यांच्यासह गोविंदराज मंडळाचे अध्यक्ष जगपती मिठ्ठा, अनिल गोसकी, दिनेश दुडम, हिरालाल माकम, अमर कोलप्याक, श्रीशैल बंदगी, गोविंद गाजूल, किरण रच्चा, चक्रधर अन्नलदास, श्रीनिवास अरकाल, शंकर श्रीकोंडा, दुर्गेश पोबत्ती, वेदांत पल्लाटी, सरस मामड्याल, बाळकृष्ण अवधूत, विठ्ठल चन्नापट्टण सह आदींचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य मिळाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पत्रकार व्यंकटेश दोंता तर, ‘ब्रतुकम्मा लोकनृत्याचे’ परिक्षण रेखा रुद्रोज यांनी केले..
श्री गोविंदराज गणेशोत्सव मंडळ व श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित, ‘पद्मशाली सखी संघम’ आयोजित ‘ब्रतुकम्मा संबरालू’ सोहळ्यात सहभागी झालेल्या महिला, युवती व मुलींनी लोकनृत्य करताना….




