ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

नगरकरांच्या प्रेमाच्या वर्षावाने भारावून गेले – पंकजा मुंडे

शहरात भाजपच्या वतीने पंकजा मुडेंचे जोरदार स्वागत

लोकसभेच्या निवडणुकीसाठी मोठा अवधी मिळाला आहे. हळूहळू निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात होईल. भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष देशात चारशेचा आकडा पार करण्याबरोबरच राज्यातही महायुती मोठा विजय मिळवेलच असा विश्वास भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी व्यक्त करत माझे वडील स्व.गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रमाणे माझ्यावरही नगरकरांनी कायमच भरपूर प्रेम केले आहे.

या प्रेमाच्या वर्षावाने मी भारावून गेले आहे. निवडणुकीसाठी ज्येष्ठ बंधू भैय्या गंधे यांनी शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद, असे सांगितले.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी गुरवारी रात्री नगर शहराला धावती भेट दिली. शहरात त्यांचे ठिकठिकाणी जल्लोषात जोरदार स्वागत करण्यात आले. शहर भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व विधानसभा निवडणूक प्रमुख भैय्या गंधे यांच्या निवासस्थानी पंकजा मुंडे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी भैय्या गंधे व सौ.मीनल गंधे यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला. यावेळी मोठ्या संख्यने पदाधिकारी उपस्थित होते.

भैय्या गंधे यांनी पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देताना सांगितले, पंकजा मुंडे यांना पक्षाने बीड मधून उमेदवारी जाहीर केली आहे. या निवडणुकीत त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित असून भाजपच्या केंद्रातील नव्या सरकारमध्ये पंकजा मुंडे कॅबिनेट मंत्री होतील, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे ज्ञानेश्वर काळे, तुषार पोटे, बाबासाहेब सानप, नरेंद्र कुलकर्णी, डॉ.ज्ञानेश्वर दराडे, राजू मंगलारप, वसंत राठोड, रेखा विधाते, प्रिया जानवे, श्वेता पंधाडे, कालिंदी केसकर, सविता कोटा, रेणुका करंदीकर, लक्ष्मिकांत तिवारी, किशोर कटोरे, ऋग्वेद गंधे, सुजाता औटी, ममता सपकाळे, गोकुळ काळे, महावीर कांकरिया, शशांक कुलकर्णी, सुमित बटूळे, श्रीकांत फंड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे