ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

पत्रकार परिषदेत आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीसह अनेक अभिनेत्रींची नावे घेत आरोप केले..

अहमदनगर प्रतिनीधी - संगिता खिलारी

मुंबई पत्रकार परिषदेत आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीसह अनेक अभिनेत्रींची नावे घेत आरोप केले होते.

आता अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं पत्रकार परिषद घेत या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलंय.अभिनेत्री, लेखिका, निर्माती प्राजक्ता माळी हिनं आज शनिवार २८ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी पाच वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली तिथं ती बोलत होती. तिनं सुरेश धस यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

हतबलता म्हणून मी शांत बसले..

गेल्या दीड महिन्यापासून हे सुरू आहे. पण हतबलता म्हणून मी शांत बसले. लोकप्रतिनिधी आपल्यावर चिखलफेक करतात, तेव्हा बोलणं गरजेचं, असल्याचं प्राजक्तानं म्हटलंय. राजकारणात महिला कलाकरांना का खेचता असा रोकठोक सवाल यावेळी प्राजक्तानं विचारला. जाहीर माफी मागावी..

बीडमध्ये कधी पुरुष कलाकार गेले नाहीत का? तुम्हा महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाहीत तर, त्यांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत, यातून तुमची मानसिकता दिसते, असं म्हणत प्राजक्तानं सुरेश धस यांना सुनावलं आहे. तर त्यांनी माझी जाहीर माफी मागी, माझीच नाही तर इतर अभिनेत्रींचंही त्यांनी नाव घेतलं, त्यांचीही माफी मागावी, अशी मागणी तिने केली.

प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं याचं भान नाही, हे त्यांनी शिकून घेतलं पाहिजे, असंही तिनं म्हटलं. अशा लोकांमुळे आमचं कलाक्षेत्र बदमान होत असल्याचंही प्राजक्ता म्हणाली..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे