ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

वंडर किड्स स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 24 डिसेंबर मंगळवार रोजी माऊली संकुल येथे उत्साहात पार पडले …

अहमदनगर

वंडर किड्स स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 24 डिसेंबर मंगळवार रोजी माऊली संकुल येथे  चिमुकल्यांच्या  उत्साहात पार पडले..

या कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी माजी नगरसेवक श्री. निखिल वारे सर व त्यांच्या पत्नी सौ. रुपाली वारे मॅडम उपस्थित होत्या..

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने आसावरी मांडोरे यांच्या डान्स नी झाली..नंतर दीपप्रज्वलन करण्यात आले.

स्कूलची यावर्षीची थिम रेट्रो टू मेट्रो म्हणजेच जुन्या गाण्यांपासून नवीन गाण्यांपर्यंत गाणी असा कार्यक्रमाचा उद्देश होता.. छोटे चिमुकलांचा डान्स पासून ते आईवडील आणि मुले यांच्या डान्स नी उपस्थित प्रेक्षकांचे वन्समोर मिळवले..

अविनाश क्लासेसच्या शिक्षिका सुजाता तुवर मॅडम यांनी पाहुण्यांचे स्वागत केले..तर श्रीयुत अविनाश जाधव सर व त्यांच्या मातोश्री आशा जाधव मॅडम यांच्या हस्ते पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.. तसेच सुनील खिलारी आणि कविता खिलारी यांच्या सह  पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले..

श्री निखिल वारे सरांनी आपले मनोगत व्यक्त केले.. जुनी शैक्षणिक पद्धती आणि सध्याची मोबाईल युगाची शैक्षणिक पद्धती ऑनलाइन शैक्षणिक पद्धती यावर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.. ते मनोगत अतिशय सुंदर पध्दतीने मांडल्या मुळे उपस्थित पालक वर्ग खुप मन लावून ऐकत होते. त्या सोबतच याच मनोगत वर आधारित मुलांनी एक नाटिका सादर केली.

तसेच शाळेच्या संचालिका सौ वैशाली अविनाश जाधव मॅडम यांनी स्कूल ची सुरुवात कशी झाली ? केव्हा झाली ? हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.. स्कूल ही अविनाश क्लासेसची एक दुसरी शाखा आहे.. 2012 मध्ये स्कूल चालू झाली . त्यावेळेस स्कूलमध्ये 27 विद्यार्थी होते .आज 2024 मध्ये स्कूलमध्ये 150 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत..प्रत्येक वर्षी स्कूल ही प्रगतीपथावर जात आहेत..

स्कूलमध्ये भारतीय संस्कृतीचा वारसा हा नेहमीच जपला जातो त्या दृष्टीने सगळे सन सनावळ साजरे केले जातात.. UkG च्याच मुलीने शिक्षकांसाठी एक छान अप्रतिम गाण गायले..

कार्यक्रम पार पडल्यानंतर 150 पालकांच्या वतीने एका पालकांनीच स्कूलचे आभार मानले..

शेवटी मुले आणि शिक्षक यांचा अप्रतिम डान्स नी पालकांची मने जिंकली..

कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी स्कूलच्या प्रिन्सिपल सौ. मोनिका दार्वेकर मॅडम, आणि इतर स्टाफ पोखरणा मॅडम, अबोली सातपुते मॅडम , डॉली सहानी मॅडम , पद्मा राजू मॅडम ,नीलिमा मॅडम, माधुरी मॅडम , विद्या वाकळे मॅडम, रेखा फुंदे , मिनल जाधव मॅडम , रूपाली भागवत मॅडम , स्नेहल डेहड्राय, माधुरी भाले, दिशा ओबेरॉय, निलिमा मॅडम, तसेच बॅक स्टेजला काम करणाऱ्या अक्तरंटी , दीपा उत्तरकर अंटी , पाणगे काका यांनी मुलांची मनापासून काळजी घेतली..

संचालिका सौ. वैशाली जाधव मॅडम नेहमीच आपल्या स्टाफचे भरभरून कौतुक करतात.

कारण त्यांची नेहमी म्हणणे असते कुठलीही मोठी गोष्ट एका व्यक्तीच्या हाताने कधीच होत नाही म्हणून त्या नेहमी इतरांना सपोर्ट करतात आणि आपले सहकार्य देतात..

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन म्हणजेच अँकरिंग कुमारी आर्या धनंजय चव्हाण हिने व्यवस्थित रित्या पार पाडले..

बॅक स्टेजला काम करणारे सौ. अविनाश क्लासेसच्या शिक्षिका सोबत मॅडम सौ भालेराव मॅडम, पठाण मॅडम यांचे सहकार्य लाभले..कोरिओग्राफर श्री अंकुश सर व डिंपल मॅडम यांनी मुलांचे डान्स बसवण्यासाठी अथक परिश्रम घेतले..कार्यक्रम संपल्यानंतर वंदे मातरम नी कार्यक्रमाची सांगता झाली..

माऊली संकुल च्या बाहेर मुलांसाठी सेल्फी पाॅईंट ठेवण्यात आला होता..

तसेच मिडीया पार्टनर AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल च्या मुख्य संपादिका सौ. श्रुती बत्तीन मॅडम नी आमचा कार्यक्रम त्यांच्या you tube चॅनेल वर live करुन कार्यक्रमला एक वेगळच वळण दिले..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे