ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल साधनांचा अभ्यास विदयार्थ्यांना आवश्यक – डाॅ. अजय पोन्नम

सोलापूर

सोलापूर महाराष्ट्र राज्य पद्मशाली महिला संघम व महाराष्ट्र राज्य पद्मशाली इंजिनिअर्स विभाग संघमच्या वतीने अरिहंत इंग्लिश मेडीयम स्कूल जुना विडी घरकूल मध्ये उन्हाळा सुट्टी निमित्त इलेक्ट्राॅनिक्स, ए.आय आणि रोबोटिक्स प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले. सदर शिबीर पंधरा दिवस चालणार आहे.

प्रशिक्षण शिबीराचे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघमचे अध्यक्ष भुपती कमटम हे होते.अरिहंत इंग्लिश मेडियम स्कूलचे संस्थापक डाॅ.अजय पोन्नम व महा.राज्य महिला संघमच्या सचिवा सुलक्षणा पोन्नम यांचे शुभहस्ते श्री सरस्वती फोटो पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात त्यानंतर व्दिपप्रज्वलन करून शिबीराचे उद्याटन करण्यांत आले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून महा.राज्य पद्म.इंजिनिअर्स विभाग संघमचे अध्यक्ष वेणुगोपाळ येमुल, सचिव व शिबीराचे मार्गदर्शक प्रशांत गाजूल, खजिनदार अमित देवसानी, पर्यवेक्षक तस्नीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रथम प्रशांत गाजूल यांनी प्रास्तिविक भाषणांत इलेक्ट्राॅनिक्स, A.I आणि रोबोटिक्स बाबत विदयार्थ्यांना माहिती दिली. यावेळी सर्व मान्यवरांचे स्कूलच्या वतीने बुके देऊन सत्कार करण्यांत आले.डाॅ.अजय पोन्नम यांनी AI आणि रोबोटिक्सबाबत माहिती देताना सध्याच्या जीवनात या दोन्ही गोष्टी जेवढ्या लवकर व चांगले शिकता येईल ते शिका कारण येणारा भविष्य या दोन्ही गोष्टीवर अवलंबून राहणार आहे असे सांगितले.अमित देवसानी यांनी AI आणि रोबोटिक्स बद्दल विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वेणूगोपाल येमुल यांनी AI चे वापर दैनंदिन जीवनात कसे करावे या बद्दल माहिती दिली.सुलक्षणा पौन्नम यांनी मार्गदर्शनात A.I.व रोबोटिक्स तंत्रज्ञान या दोन्ही गोष्टी स्कूल मधील आम्हा शिक्षकांना दिल्यास तेही अपडेट राहतील असे म्हणाले.

शेवटी भुपती कमटम यांनी अध्यक्षीय भाषणांत शिबिराचे मुख्य उद्देश व या गोष्टीचे गरज सध्याच्या पिढीला किती गरजेचे आहे याचे महत्व मुलांना सांगितले.महाराष्ट्र राज्य पद्मशाली महिला संघमचे अध्यक्षा संगीता इंदापुरे यानी सदर शिबीराचे आयोजन केले.

महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघमचे प्रधान सचिव यशवंत इंदापुरे , रजनी सग्गम यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.सदर कार्यक्रमांस शिक्षक शिक्षिका तसेच विदयार्थी आणि पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुंत्रसंचलन फौजान अजहरी यानी केले तर अर्चना महाकाळ यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे