ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंग

पुण्यात मराठी अभिनेत्रीवर बलात्कार

पुणे

पुण्यात मराठी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याप्रकरणी माजी आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने लग्नाचे आमीष दाखवून तरुणीला जाळ्यात ओढलं होतं.

विवाहाच्या आमिषाने मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी सोलापुरातील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महत्त्वाची बाब म्हणजे गुन्हा दाखल झालेला तरुण माजी आमदाराचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे.

तक्रारीत आरोपीने डोक्याला पिस्टल लावून धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

याप्रकरणी विराज रविकांत पाटील (वय 35, रा. रॉयल पाल्म, सोरेगाव, सोलापूर) याच्याविरुद्ध विमाननगर पोलीस ठाण्यात बलात्कार, तसेच शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

32 वर्षीय पीडित तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दिली होती. यावरुन विराज रविकांत पाटील याच्यावर आयपीसी 376, 376(2)(एन), 377, 323, 504, 506, सह आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा सगळा प्रकार 27 ऑगस्ट 2023 ते 20 जानेवारी 2024 या कालावधीत विमाननगर व मुळशी येथील एका रिसॉर्टमध्ये घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मॉडेलिंग करते. तिने मराठी चित्रपटात काम केले आहे. अद्याप चित्रपट प्रदर्शित झालेला नाही.

सोशल मीडियातून तिची विराज पाटीलशी ओळख झाली होती. दोघे एकमेकांच्या संपर्कात आले. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेऊन विवाह करणार असल्याचे आमिष विराजने अभिनेत्रीला दिले होते. मात्र त्यानंतर त्याने लग्नाबाबत विचारले असता तरुणीला धमकावले.

आरोपी विराज पाटील याने पत्नीसोबत घटस्फोट घेऊन तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगत तरुणीला लग्नाचे आमिष दिले होते. त्यानंतर आरोपीने पीडित तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर आरोपी पीडित तरुणीला टाळू लागला. त्यामुळे फिर्यादी तरुणीने विराजकडे याबाबत त्याच्याकडे विचारणा केली. मला घरच्यांना का भेटवत नाही अशी विचारणा तरुणीने विराजला केली होती. त्यावर विराज पाटीलने तिला शिवीगाळ केली. त्यानंतर जवळ असलेली पिस्टल तरुणीच्या डोक्याला लावून मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही, तू जर पोलिसांकडे गेली तर तुला दाखवतो मी कोण आहे, अशी धमकी दिल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे.

दरम्यान, आरोपी विराज पाटील याची राजकीय पार्श्वभूमी देखील आहे. माजी आमदार रविकांत पाटील यांचा विराज हा पुत्र आहे. रविकांत पाटील हे कर्नाटकमधील इंडी मतदार संघाचे माजी आमदार आहेत. तसेच सोलापूरातून त्यांनी लोकसभेची निवडणूक देखील लढवली होती.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे