ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

मी महाराष्ट्रातील ज्येष्ठ संपादक, इच्छा झाली तर मुख्यमंत्र्यांच्या प्रेसला जाणार

छत्रपती संभाजीनगर - पोलिसांनी खासदार संजय राऊत यांना दिला पत्रकार परिषदेचा पास

मी महाराष्ट्रातील ज्येष्ठ संपादक आहे. माझी इच्छा झाली तर मी मुख्यमंत्र्यांच्या प्रेसला नक्की जाणार आहे. पण मी गेलो तर मला पोलिस अडवतील आणि गोंधळ होईल. मला असा गोंधळ नको आहे. असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या प्रत्रकार परिषदेला जाण्याची इच्छा व्यक्त केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये मलाही मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचे आहेत. त्यामुळे मी देखील पत्रकार परिषदेला जाणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी काल म्हटले होते. त्या नंतर मला अनेक अधिकाऱ्यांचे फोन आले असून माझ्याकडे पोलिस देखील आले होते, असा दावा संजय राऊत यांनी केला. खुद्द पोलिस आयुक्तांनी मला या प्रकरणी प्रश्न विचारला असल्याचे ते म्हणाले. मी जाणार म्हटले तरी सत्ताधारी का घाबरले‌? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

संजय राऊत यांना पोलिसांनी दिला पास

विशेष म्हणजे खासदार संजय राऊत यांना पोलिसांनी पत्रकार परिषदेत उपस्थित राहण्यासाठी पास दिला असल्याची माहिती पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली आहे. त्यामुळे आता संजय राऊत मुख्यमंत्री यांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहणार का? आणि पोलिस त्यांना आतमध्ये सोडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हॉटेलमध्ये राहण्यावरुन टीका

मंत्रिमंडळ बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगरमधील मोठ्या हॉटेलमध्ये मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांचा मुक्काम होता. मात्र, विरोधकांसह आम्ही लस टोचल्यानंतर त्यांनी हा मुक्काम सुभेदारी विश्रामगृहात हलवला असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. इंडिया आघाडीसाठी मुंबईत आलेल्या नेत्यांना आम्ही देखील हॉटेलमध्ये ठेवले होते. मात्र, त्याचा खर्च तिन्ही पक्षांनी मिळून केला असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर येथील खर्च हा शासकीय म्हणजेच जनतेच्या पैशातून होत असल्यावरुनही संजय राऊत यांनी टीका केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे