300 वर्षांनी गणेश चतुर्थीला सूर्य शनी राजयोग
गणेश चतुर्थी यंदा अतिशय खास आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी तीन शुभ योगांसोबत सूर्य शनी रायजोग तयार झाला आहे. यामुळे काही मंडळांना बाप्पाचा आशिर्वाद मिळणार आहे.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नक्षत्र आणि ग्रहांच्या हालचालीमुळे शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात. यंदाची गणेश चतुर्थी अतिशय खास आहे. तब्बल 300 वर्षांनी प्रथमच तीन मोठे आणि अतिशय शुभ असे राजयोग तयार झाले आहे.
पंचांगानुसार 19 सप्टेंबर मंगळवारी शुक्ल योग, ब्रह्म योग आणि शुभ योग जुळून आले आहेत. त्याशिवाय 17 सप्टेंबरला रविवारी सूर्याचं महागोचर होणार आहे. शिवाय शनीची शक्ती जागृत झाल्यामुळे सूर्य शनि राजयोगाचा काही राशींना फायदा होणार आहे. बाप्पा या मंडळांसाठी धनलाभाचा योग घेऊन आाला आहे.
गणेश चतुर्थीला ‘या’ राशी होणार श्रीमंत..
मकर
या राशींच्या लोकांना गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाची विशेष कृपा बरसणार आहे. तीन विशेष राजयोग या मंडळींना आर्थिक फायदा करणार आहे. व्यवसात नफा मिळणार आहे. प्रवासाचे योग आहेत. गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होणार असून हा काळ गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास दुहेरी फायदा होणार आहे.
मिथुन
या राशींच्या लोकांवर बाप्पाची विशेष कृपा असणार आहे. या लोकांना धनलाभाचे अतिशय शुभ योग जुळून आले आहेत. तुमचे अडकलेले पैसेदेखली या काळात परत मिळणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम असणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. विवाहित मंडळींसाठी आनंदायी काळ असणार आहे. नातेसंबंध सुधारणार आहे.
मेष
गणेश चतुर्थीला जुळून आलेले तीन विशेष राजयोग हे मेष राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांना त्यांच्या मेहनतीचं उत्तम फळ मिळणार आहे. मुलांकडून आनंदाची तर बायकोकडून गोड बातमी कानी पडणार आहे. समाजात तुमचा मान सन्मान वाढणार आहे. करिअरमध्ये तुम्ही उंच शिखर गाठणार आहात. बाप्पाचं आगमन तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे.