ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुम्ही खात असलेली मिठाई नकली ? प्रसादाच्या नावाखाली शिर्डीतही विकला जातोय भेसळयुक्त पेढा

मुंबई - त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसादाचा पेढा बनवण्यासाठी वापरण्यात आलेले विना दुधाचा बनावट खवा जप्त करण्यात आल्यानंतर आता याचं शिर्डी कनेक्शनही समोर आलंय. साईंच्या मंदिराबाहेर मिळणारा पेढाही विना दुधाचा असल्याची बाब उघड झालीय. सणासुदीच्या दिवसात नकली खवा वापरून भाविकांच्या आरोग्याशी राजरोसपणे खेळ सुरूंय.

 सध्या सणवाराचे दिवस आहेत. गणेशोत्सवात बाप्पाला नैवेद्य म्हणून पेढ्यांचा प्रसाद दाखवला जातो. दर्शनासाठी आलेल्या पाहुण्यांना मिठाई दिली जाते. मात्र बाजारातून पेढे, मिठाई खरेदी करताना सावध राहा. हा प्रसाद तुमच्या जीवावरही बेतू शकतो. कारण ऐन सणासुदीच्या काळात भेसळखोरांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. बनावट खवा आणि भेसळयुक्त पाम तेलाचा वापर बनवलेल्या पेढ्यांची आणि मिठाईची सर्रासपणे विक्री साईबाबांच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक शिर्डीलाभेट देतात.

साईंचं दर्शन घेतल्यानंतर प्रसादाचे पेढे आवर्जून घेतात. मात्र याच प्रसादात भेसळ केली जातेय. कारण अन्न आणि औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत शिर्डीतल्या साई मंदिराबाहेर मिळणारा पेढा विना दुधाचा बनत असल्याचं समोर आलंय. नाशिकमध्ये जप्त करण्यात आलेल्या 1100 किलो खव्यापैकी शंभर ते दीडशे किलो खवा शिर्डीतल्या पेढे विक्रेत्यांचा असल्याचं स्पष्ट झालंय. प्रसादाचा मलई पेढा सांगून या पेढ्याची 500 ते 600 रूपये किलो दरानं विक्री केली जाते.

काय त्रास होतो?
भेसळयुक्त पेढे किंवा मिठाई खाल्ल्ल्यास घशात खवखव होते, खोकला येतो आणि पोटात दुखतं. चक्कर येणं, मळमळ, उलटी, जुलाब लागू शकतात. काविळसारख्या आजाराची लागण होऊ शकते.  किडनी आणि लिव्हरवरही वाईट परिणाम होऊ शकतो. इतकच नाही तर विषबाधा जास्त झाल्यास मृत्यूही ओढावू शकतो.

असं असतानाही केवळ श्रद्धेच्या आहारी जाऊन भाविक प्रसाद म्हणून हे पेढे आणि मिठाई खरेदी करतात. मात्र डोळे झाकून घेतलेला हा प्रसाद तुम्हाला हॉस्पिटलची वारीही घडवू शकतो. त्यामुळे उघड्यावरील दुकानातून पेढे घेऊ नका. पेढे किंवा मिठाई खात्रीशीर असलेल्या नामांकित दुकानातूनच घ्यावेत. पेढे घेताना एक्सपायरी डेट पाहावी. पेढे घेताना तारखेसह आपल्या नावाने बिल घ्यावं. पेढे दुधापासून बनवले की नाहीत याची खात्री करून घ्यावी.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे