राज्य मुक्त विद्यालय मंडळात पाचवी-आठवीसाठी विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीसाठी मुदतवाढ
पुणे

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या आणि जानेवारी-फेब्रुवारी २०२४ मध्ये होणाऱ्या मूल्यमापन सत्रासाठी विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीचा अर्ज ३० सप्टेंबरपर्यंत करता येणार आहे.
विद्यार्थ्यांचे ऑनलाइन नावनोंदणी अर्ज करण्यासाठी शनिवारपासून (ता. १६) सुविधा उपलब्ध होणार आहे. तर हे नोंदणी अर्ज ३० सप्टेंबरपर्यंत भरता येणार आहेत. विद्यार्थ्यांचे मूळ अर्ज, शुल्क आणि मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करण्यासाठी १८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे.
तर संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, शुल्क, मूळ कागदपत्रे आणि यादी ११ ऑक्टोबरपर्यंत विभागीय मंडळात जमा करायची आहे.
मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी ‘http://msbos.mh-ssc.ac.in’ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे प्रभारी सचिव माणिक बांगर यांनी प्रकटनाद्वारे केले आहे.