ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

अहिल्यानगर जिल्हा परिषद गट शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांना शिक्षणाधिकारी पदी बढती

अहिल्यानगर

जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत नेवासा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांची नुकतीच पदोन्नती शिक्षणाधिकारी प्राथमिक या पदावर झाली आहे .

शासनाने नुकतेच तसे आदेश काढले आहेत .गटशिक्षणाधिकारी पदावर कामकाज करताना त्यांनी काम केलेल्या सर्वच तालुक्यात अत्यंत चांगले कामकाज केले आहे . अत्यंत कडक शिस्तीच्या अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे .

ज्ञानरचनावादावर आधारीत अध्यापन, शिक्षकांना सोबत घेत कोव्हिड काळातील संगमनेर मधील कामकाज, शाळा स्तरावर राबवलेले विविध उपक्रम,मिशन आरंभ, मिशन आपुलकी यामध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केले .

शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून काम करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल .

पदोन्नती बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे